कलाशिक्षक दत्ताजी राठोडांनी ‘I Pad’ने साकारले गणेश

Art Teacher Dattaji Rathore
Art Teacher Dattaji Rathoreesakal
Updated on

नाशिक : ओझरमधील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचएएल शाळेतील निवृत्त कलाशिक्षक दत्ताजी राठोड यांनी गणरायाचे स्वागत अगदी हटक्या पद्धतीने केले. निवृत्तीनंतर काय करावे, असा प्रश्न अनेकांना पडत असतो.

पण आराम करण्याच्या वयात वेगळे काहीतरी शिकायचे, अशी जिद्द बाळगणारे श्री. राठोड यांनी ‘आय पॅड’ शिकण्याचा संकल्प सोडला. ‘आय पॅड’च्या माध्यमातून त्यांनी गणेशाचे डिजिटल पोर्ट्रेट साकारले आहे. (Art teacher Dattaji Rathore created Ganesh with iPad Latest Marathi News)

Art Teacher Dattaji Rathore
Nashik : पंचवटी विभागात NMCकडून 341 मूर्ती संकलन
कला शिक्षक दत्ताजी राठोड यांनी बनवलेले गणेशाचे चित्र
कला शिक्षक दत्ताजी राठोड यांनी बनवलेले गणेशाचे चित्रesakal

कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षे घरी बसलेले असताना श्री. राठोड ‘आय पॅड’ शिकले. मुलगा कुणालने त्यांना नवीन ‘आय पॅड’ची भेट दिली. यू-ट्यूबच्या माध्यमातून त्यांनी शिकायला सुरवात केली. त्यांनी गणरायाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सुंदर डिजिटल पोर्ट्रेट तयार केली आहेत.

आजच्या पिढीला ही कला समजली पाहिजे, यासाठी ते दोन्ही मुलांना शिकवत आहेत. वयाच्या ६५ व्या वर्षी ‘आय पॅड’ हातात घेतलेले श्री. राठोड डिजिटल उपकरणांमुळे चित्रे खूप आकर्षित होतात, हे स्वानुभवातून सांगतात.

कला शिक्षक दत्ताजी राठोड यांनी बनवलेले गणेशाचे चित्र
कला शिक्षक दत्ताजी राठोड यांनी बनवलेले गणेशाचे चित्रesakal
Art Teacher Dattaji Rathore
Nashik Crime : 75 लाखांचे विदेशी मद्य पाडळी शिवारातून जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules
Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
Marathi News Esakal
www.esakal.com