फ्लिपकार्टच्या वॉलेटमध्ये मारला झाडू; तरूणाची 30 हजाराची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

फ्लिपकार्टच्या वॉलेटमध्ये मारला झाडू; तरूणाची 30 हजाराची फसवणूक

जळगाव : तरुणाच्या फ्लिपकार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी करुन त्याची २९ हजार ७९७ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्र्यंबक नगरातील विश्वजीत अपार्टंमेंट येथे तेजेश्वरराव गोकूळ पाटील (वय ३२) वास्तव्यास आहेत. तेजेश्वरराव यांच्या फ्लिपकार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे, सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या वॉलेट मधुन तब्बल २९ हजार ७९७ रुपयांत संबंधितांनी ऑनलाईन खरेदी करुन फसवणूक केली. २ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संबंधितांनी ही खरेदी केली होती असे समोर आले. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर तेजेश्वरराव यांनी आज रामानंदनगर पोलिसात तक्रारी दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

हेही वाचा: जामनेरातून चोरलेल्या दारूची जळगावात विक्री

हेही वाचा: विवाहाच्या पाच दिवसांपूर्वीच नवरदेवाचा विहिरीत पडून मृत्यू

Web Title: 30 Thousand Rs Fraud With Young Boy In Flipkart Wallet Jalagon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top