जामनेरातून चोरलेल्या दारूची जळगावात विक्री

Daru
Daruesakal
Updated on

जळगाव : गाडेगाव नेरी (ता. जामनेर) येथील एका हॉटेलातून चोरलेल्या देशी-विदेशी दारूची विक्रच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली व त्यांनी चोरी केलेला काही माल जप्त केला आला असून, त्यांचे तीन साथीदार फरारी झाले आहेत.

गाडेगाव नेरी येथील हॉटेल शशीप्रभा फोडून १ लाख १० हजार २२५ रुपयांची देशी-विदेशी दारू चोरून नेली होती. हॉटेलचा मॅनेजर शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी चोरीची दारू विक्रीच्या प्रयत्नातील दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय २२, रा. मच्छी मार्केट, सुप्रिम कॉलनी), सागर लक्ष्मण वाधवाणी (२०, रा. बाबानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५४ हजार ५६७ रुपयांची देशी विदेशी दारू ताब्यात घेतली आहे.

Daru
रावेरला दीड कोटीचा ‘टॉयलेट घोटाळा’
Daru
व्हिडीओ कॉलवर विवस्त्र होत तिच्याशी बोलण वृद्धाला पडल महागात; बसला मोठा गंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com