Crime News : अमळनेरात तणावपूर्ण शांतता 35 जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल

Rioting Case
Rioting Caseesakal

अमळनेर : शहरातील झामी चौक भागात झालेल्या दगडफेकीप्रकरणी संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील शांततेला गालबोट लागू नये, यासाठी सर्व समाजघटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. प्रवीण मुंढे यांनी आज येथे केले.

येथे ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर दोन गटांत झालेल्या भांडणात काही घरांवर व दुकानांवर दगडफेकीची घटना घडली होती. यात ३० ते ३५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील गजबजलेल्या व हिंदू -मुस्लिम समाजाची वस्ती असलेल्या या भागात ईद-ए-मिलाद व वाल्मीक जयंतीच्या एक दिवस आधीच किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाले. त्याचे पर्यावसन दगडफेकीत होऊन त्यात काही दुकानांचे नुकसान झाले. जमाव अधिक हिंसक होण्याआधीच पोलिसांनी धाव घेत रात्रीच घटनेवर नियंत्रण मिळविले.(35 people Registered for Rioting case in Amalner Jalgaon Crime News)

Rioting Case
Kirankumar Bakale Controversial Statement : बकालेंच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक

डॉ. मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आज दंगलग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरून ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. रात्री १२ च्या दरम्यान नाविद शेख व त्याच्यासोबतचे काही मित्रांनी रात्री बाराच्या दरम्यान दुचाकी रॅली काढून, घोषणा देत, तसेच हॉर्न वाजवत माळीवाळा भागातून जात असल्याने त्यांना हटकण्यात आले. त्यांनी मला दगड फेकून मारला.

यात माझ्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव सुरू झाला. त्या वेळी मनोज महाजन व इतर काही महिलांना देखील दगड लागले. सचिन महाजन यांच्या फिर्यादीवरून ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक गंभीर शिंदे तपास करीत आहेत. दुसऱ्या गटाकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Rioting Case
Crime News : फाईल्ससह रक्ताने माखलेला चाकु भोईटेंच्या घरात केला प्लांट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com