Jalgaon GMC News : ‘जीएमसी’तील मुदतबाह्य कीट प्रकरणी चौकशी; चारसदस्यीय समिती नियुक्त

Jalgaon Government Medical College and Hospital
Jalgaon Government Medical College and Hospitalesakal

Jalgaon GMC News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यामध्ये कालबाह्य किट आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चारसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथॉलॉजी विभागात चाचण्या करताना मुदतबाह्य किट वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. (4 member committee has been appointed to inquire into case of out of date items in GMC jalgaon news)

ॲड. पीयूष पाटील यांच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून हा प्रकार उघड केला. त्यात शरीरावरील गाठीचे निदान करण्यासाठीच्या ‘स्टेनिंग किट’ची एक्स्पायरी जुलै २०२२ होती, तरीही ते वापरले जात असल्याचे आढळून आले. जवळपास दोन हजार ५०० किट जप्त करण्यात आले होते.

अन्न व औषध प्रशासन उपायुक्त माणिकराव यांनी यासंदर्भात अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे त्याच दिवशी सादर केलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Government Medical College and Hospital
Jalgaon Crime : पतसंस्थेच्या अवसायकाला 5 लाखांची लाच घेताना अटक

यांची चौकशी समिती

त्यानंतर तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अधिष्ठाता गिरीश ठाकूर यांच्या आदेशान्वये औषधशास्त्र विभागाचे डॉ. प्रवीण लोहार यांच्या अध्यक्षतेत प्रा. डॉ. किशोर इंगोले, डॉ. ज्योती बागूल, डॉ. विजय गायकवाड अशी चार सदस्य चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

समिती गठित झाल्याबाबतचे पत्र आज प्राप्त झाले. समितीकडून निपक्षपाती व पारदर्शक चौकशी अहवालाची अपेक्षा करतो. समितीने कोणाच्याही दबावाला बळी न पडता चौकशी करून अहवाल सादर करावा, हीच अपेक्षा असल्याचे मत तक्रारदार पीयूष पाटील यांनी व्यक्त केली.

Jalgaon Government Medical College and Hospital
Jalgaon Crime News : राज्य उत्पादन शुल्क, पोलिसांचे गावठी दारूविरोधात धाडसत्र; 2 दिवसांत 105 गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com