Jalgaon Hatnur Dam : हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Discharge of water through 41 gates of the dam.
Discharge of water through 41 gates of the dam.esakal

Jalgaon Hatnur Dam : तालुक्यातील हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून, शनिवारी (ता. १६) सकाळी सातला धरणाचे ४१ पैकी चार दरवाजे पूर्ण, तर ३७ दरवाजे तीन मीटर उघडण्यात आले. (41 gates of Hatnur dam opened jalgaon news)

धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रपात सुरू असून, तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तापी नदीपात्रात सद्यस्थितीत तीन लाख ३० हजार ६५४ क्यूसेक्स विसर्ग हतनूर धरणातून सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Discharge of water through 41 gates of the dam.
Jalgaon Anandacha Shidha : जळगावमध्ये आनंदाचा शिधावाटप सुरू

पाणीपातळी २१३.१७० मीटर असल्याने एकूण साठा ३४०.६० दशलक्ष घनमीटर वाढल्याने हतनूर धरणात एकूण साठ्यात ८७.७६ टक्के वाढ झाली.

नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Discharge of water through 41 gates of the dam.
Jalgaon Rain Update : जिल्ह्यात पावसाचा पुन्हा ‘ब्रेक’; शुक्रवार-शनिवारी जोरदार पावसाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com