Jalgaon : जुगार अड्ड्यावरील छाप्यात 5 अटकेत | Latest crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raid on gambling den latest marathi news

Jalgaon : जुगार अड्ड्यावरील छाप्यात 5 अटकेत

जळगाव : शहरातील तांबापुरा परिसरात सोरट जुगार (Gambling) सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा (Raid) टाकून पाच संशयितांना रोकडसह ताब्यात घेतले. एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. (5 arrested in gambling den raid jalgaon Latest crime news)

हेही वाचा: नाशिकमध्ये OBCच्या एका जागेत घट; 36 ऐवजी 35 नगरसेवक

शहरातील तांबापुरा परिसरात टिपू सुलतान चौकात आडोशाला सोरट जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती सहाय्यक फौजदार अल्ताफ पठाण यांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या सूचनेवरून गुन्हे शोधपथकाने नियोजनबद्धरीत्या छापा टाकला.

पोलिस पथकाने शेख आसिफ शेख अन्वर (वय ३९), शेख अकिल शेख अहमद (३८), रईसखान अकबरखान (२५), शेख हुसनोद्दीन शेख समसोद्दीन (३६) आणि फारुख लतीफ पटेल (२२) यांना रोकडसह अटक करण्यात आली असून, एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार अल्ताफ पठाण तपास करीत आहेत.

हेही वाचा: देवळाली, भगूरचे महापालिकेत विलीनीकरण शक्य?

Web Title: 5 Arrested In Gambling Den Raid Jalgaon Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..