Skill Development Mission : कौशल्य विकास मिशनला कुलगुरू शिष्यवृत्ती’चे बळ; व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

Skill Demand Survey participation
Skill Demand Survey participationsakal

Jalgaon News : विद्यापीठाने ‘एमकेसीएल’सोबत केलेल्या करारांतर्गत विशारद स्कील डेव्हलपमेंट माध्यमातून महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांना क्लिक कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या कोर्सेससाठी आकारल्या जाणाऱ्या एकूण शुल्कातील विद्यापीठाला मिळणाऱ्या शुल्कापैकी ५० टक्के शुल्काला ‘कुलगुरू कौशल्य विकास शिष्यवृत्ती’ म्हणून सूट देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. (50 percent discount on MKCL course fees with skill development mission jalgaon news)

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. बैठकीत विविध विषयांना मान्यता देण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एम.के.सी.एल. सोबत विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे ६० तासांचे २ क्रेडीट असलेले आणि १२० तासांचे ४ क्रेडीट असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

६७ कोर्सेस उपलब्ध

एकूण ६७ कोर्सेस यामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये अकाउंटिंग करिअर, बँक ऑफिस करिअर, डिझायनिंग, डिजिटल आर्टस, डिजिटल फ्री लान्स तसेच हार्डवेअर व नेटवर्क मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आदी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यातील काही कोर्सेसचे शुल्क ५ हजार रुपये आहे.

काहींचे अडीच हजार रुपये शुल्क आहे. या शुल्कापैकी एम.के.सी.एल.ला दिले जाणारे शुल्क वगळता विद्यापीठाला प्राप्त होणाऱ्या शुल्कातून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कुलगुरू कौशल्य विकास शिष्यवृत्ती’ म्हणून ५० टक्के शुल्क सूट देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Skill Demand Survey participation
Business मध्ये नफा कमवायचा असेल तर ही Skills असणं गरजेचं

स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स ऑनलाइन मोडवर

विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी व मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स’ हा ऑनलाइन मोडमध्ये सुरु करण्याच्या महत्त्वाच्या निर्णयाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.

निसर्ग संवर्धन मंडळ व्हावे

विद्यापीठाने लोकसहभागातून जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यात ७५ महत्त्वाकांक्षी मियावाकी घनवनांची निर्मिती टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून लोकसहभागातून ७५ मियावाकी घनवनांची निर्मिती काही वर्षात करावी यावर बैठकीत चर्चा झाली. महाविद्यालयस्तरावर निसर्ग संवर्धन मंडळ तयार केले जावे. त्यासंदर्भात नियमावली करण्यासाठी या बैठकीत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘मनकौशल्य’ योजनेस मान्यता

विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या वतीने विद्यापीठ प्रशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक वर्षापासून मनकौशल्य ही नवी योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेत संभाषण कौशल्य, नेतृत्व कौशल्य, सामाजिक प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, ताण आणि वेळेचे व्यवस्थापन, विवाहपूर्व समुपदेशन आदींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यापीठात एम.ए. नाट्यशास्त्र हा अभ्यासक्रम सुरु होत असून त्याच्या नियमावली व प्रवेश शुल्काला मान्यता देण्यात आली.

Skill Demand Survey participation
Communication Skill : बोलताना या चुका दाखवतात तुमचा Low Confidence

बैठकीस प्र-कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे, राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. एस.टी. भुकन, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, भरत गावित, अॅड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ. पवित्रा पाटील, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. विनोद पाटील, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील हे उपस्थित होते.

विद्यापीठ स्तरावर ‘लोकपाल’

विद्यापीठातील विविध प्रशासकीय व शैक्षणिक विभागांच्या संरचनेत व कार्यपद्धतीत बदल करण्याबाबत प्रा. पी.पी. माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या अहवालाला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ स्तरावर लोकपाल नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने लोकपाल नियुक्तीच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देण्यात आली.

असे झाले निर्णय

- ‘एमकेसीएल’अंतर्गत कोर्सेसच्या विद्यापीठाला मिळणाऱ्या शुल्कात ५० टक्के सवलत

- व्यक्तिमत्त्व विकास, अन्य कौशल्यांसाठी ‘मनकौशल्य’ योजनेस मान्यता

- विद्यापीठात एम.ए. नाट्यशास्त्र अभ्यासक्रम सुरु करण्यासह शुल्कास मान्यता

- निसर्ग संवर्धन मंडळ स्थापण्यास मान्यता

- स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स हा ऑनलाइन मोडमध्ये सुरु करणार

Skill Demand Survey participation
Skill Training: कौशल्य प्रशिक्षणासाठी सर्वेक्षण मोहीम! जिल्ह्यातील युवक-युवती, उद्योजकांना सहभागाचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com