Jalgaon Accident News : कुत्र्याला वाचवितांना रिक्षा उलटून 6 प्रवासी गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Jalgaon Accident News : कुत्र्याला वाचवितांना रिक्षा उलटून 6 प्रवासी गंभीर जखमी

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरसमोर रविवारी (ता. २२) सकाळी दहाच्या सुमारास भरधाव रिक्षासमोर अचानक कुत्रा आला. कुत्र्याला वाचविण्याच्या नादात रिक्षा उलटली. (6 passengers seriously injured during rickshaw overturned to save dog jalgaon news)

या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. बेडा (ता. जळगाव) येथील काही जण लग्नाचा बस्ता करण्यासाठी चाळीसगाव येथे ऑटोरिक्षाने जात होते.

दूरदर्शन टॉवरजवळ भरधाव रिक्षासमोर अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा उलटली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon Crime News : रेल्वे प्रवाशाला गुंगीचे औषध देउन 1 लाख लांबविले

या अपघातात रिक्षाचालक अमोल सुभाष वाघ, संगीता सुरेश वाघ, साहेबराव द्वारकू गवई (वय ६५), रेखा साहेबराव गवई (वय ५५), मंदा गणूदास वाघ (वय ४५) आणि जया गणूदास वाघ (वय २१, सर्व रा. बेडा, ता. जि. जळगाव) जखमी झाले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने अपघात घडल्यानंतर मागून किंवा समोरून कोणतेही वाहन न आल्याने मोठी दुर्घटना टळली

हेही वाचा: Jalgaon News : कजगावच्या युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न