Jalgaon News : कजगावच्या युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire

Jalgaon News : कजगावच्या युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : कजगाव (ता. भडगाव) येथील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने कंटाळलेल्या एका तरुणाने सोमवारी (ता. २३) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. (complaint regarding encroachment Collector Office while no action is taken youth Attempt to suicide jalgaon news)

यामुळे उपस्थितांसह पोलिसांची एकच धांदल उडाली. कजगाव गावात शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. मात्र, काही राजकीय व्यक्तींमुळे या अतिक्रमणावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप भूषण नामदेव पाटील यांनी केला आहे.

अतिक्रमण काढून या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक होईल, एवढीच जागा आहे. मात्र, वेळोवेळी तक्रारी करूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने सोमवारी श्री. पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon news : नीम येथील ग्रामसेवक लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

त्यांनी कॅनमधून पेट्रोल अंगावर टाकत आत्मदहन करणार तेवढ्यात पोलिसांनी त्यांच्या हातून कॅन हिसकावून त्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेऊन कारवाई केली.

हेही वाचा: Jalgaon Crime News : रेल्वे प्रवाशाला गुंगीचे औषध देउन 1 लाख लांबविले