Bhusawal Central Railway : तिकीट न विकता भुसावळ रेल्वेला 60 कोटींचे उत्पन्न

bhusawal railway station
bhusawal railway stationesakal

Bhusawal Central Railway : भुसावळ रेल्वे विभागाने एकही तिकीट न विकता ५९ कोटी ९३ लाखांचा, तर तिकीट विक्री व दंडातून ६४ कोटींचा महसूल मिळवला आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण १२९ कोटी ८८ लाखांचा महसूल मिळवला.(60 crore revenue to Bhusawal Railway administration without selling tickets jalgaon news)

विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ही कामगिरी केली आहे. नोव्हेंबरमध्ये प्रवाशांसाठी नांदगाव रेल्वे स्थानकात दिव्यांग शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आले. स्टेशन बुकिंग सेवकची वरणगाव, बिस्वा ब्रीज, माना स्थानक येथे नियुक्ती करण्यात आली.

bhusawal railway station
Bhusawal Railway News : भुसावळ विभागातून धावणाऱ्या 4 गाड्या या तारखेपर्यंत रद्द

आकडे बोलतात

(महसुलाची रक्कम रुपयांमध्ये)

० प्रवासी वाहतुकीतून : ६४ कोटी ९९ लाख

* माल वाहतुकीतून : ५४ कोटी २४ लाख

* पार्सल वाहतुकीतून : २ कोटी ८ लाख

* तिकीट तपासणीतून : ६ कोटी ४२ लाख

* पार्किंगमधून : ९ लाख १५ हजार

* वाणिज्य प्रसिद्धी, जाहिराती : ७४ लाख ८७ हजार

* खानपान विभागातून : ९५ लाख ४१ हजार

* फूटकर उत्पन्न : २ कोटी १२ लाख

bhusawal railway station
Bhusawal Central Railway : मध्य रेल्वेला भंगारातून 202 कोटींची कमाई; ‘झिरो स्क्रॅप’ मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com