Bhusawal Central Railway : मध्य रेल्वेला भंगारातून 202 कोटींची कमाई; ‘झिरो स्क्रॅप’ मोहीम

bhusawal railway station
bhusawal railway stationesakal

Bhusawal Central Railway : गेल्या सहा महिन्यांत मध्य रेल्वेने भंगारविक्रीतून २०२ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागाच्या विविध ठिकाणी शून्य भंगार मोहीम राबवण्यात आली होती. (202 crore earned by Central Railway from scrap bhusawal jalgaon news)

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार वापरात नसलेले रेल्वे रूळ भंगारात देण्यात आले. लोह, स्टील, अ‍ॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री करण्यात आली. मोडीत काढलेले रेल्वेचे डबे, वाघिणी, इंजिने, जुने डबे, माल डबे, चाके इत्यादींचा त्यात समावेश होता. ३० एप्रिल ते १० ऑक्टोबरपर्यंत भंगारविक्रीतून २०२.२५ कोटी एवढा महसूल मध्य रेल्वेने मिळवला.

मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२३ पर्यंत १९३.४५ कोटींचा महसूल नोंदवला होता. ३०० कोटींच्या विक्री लक्ष्यापेक्षा त्यात ६६.४० टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.

bhusawal railway station
Jalgaon Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले शनिवारी जळगाव जिल्ह्यात

१३,६६२ टन रेल्वे रूळ, १२ लोकोमोटिव्ह, १७४ रेल्वे डबे आणि १०७ वॅगन यांचा भंगारात समावेश होता.

मुंबई विभागातून ३०.०७ कोटी, भुसावळमधून ४०.६५ कोटी, पुणे १८.६२ कोटी, सोलापूर १३.२४ कोटी, नागपूर १३.९० कोटी, माटुंगा ३०.९७ कोटी, भुसावळमधील इलेक्ट्रिक लोको शेड डेपो १९.०८ कोटी आणि इतर ठिकाणांहून २६.९२ कोटींची भंगारविक्री करण्यात आली.

bhusawal railway station
Jalgaon News : विस्तारित भागातील रहिवाशांच्या नशिबी ‘वनवास’; हद्दवाढीचा प्रश्‍न प्रलंबितच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com