67 couples elope and get married in 2 years jalgaon news
67 couples elope and get married in 2 years jalgaon newsesakal

Jalgaon News : 2 वर्षांत 67 प्रेमीयुगल झाले भुर्रर्र...! वाढत्या घटनांमुळे पालक चिंताग्रस्त

Jalgaon News : ‘प्रेमात सगळं माफ असतं’ असं म्हटलं जातं. अशा प्रेमवीरांचा सध्या पळून जाऊन लग्न करण्याचा जोरदार सपाटा सुरू आहे. येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांत ६७ तरुणी व महिला पळून गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

नोंद नसलेल्यांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (67 couples elope and get married in 2 years jalgaon news)

अशा घटनांमधून मोठ्या प्रमाणावर ‘सैराट झालं जी’ची प्रचिती येत आहे. अशा घटना टाळण्यासाठी मोबाईलच्या युगात पालक आणि मुलांमध्ये सुसंवाद होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. येथील पोलिस ठाण्यांतर्गत तरुणी व महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे.

मोबाईल आता प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे तरुणाई सर्वाधिक वेळ सोशल नेटवर्किंग साइटवर खर्च करतात. सोशल मीडियातील ओळखीतून अनेक प्रेम प्रकरणे समोर आली आहेत. त्यातच घर सोडून जाण्याचे किंवा मुलासोबत पळून जाण्याचे प्रकार घडतात.

शारीरिक आकर्षण, प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाहाचे आमिष दाखवून मुलींसह महिलांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. कुटुंबांचा विरोध डावलून पळून जाण्याचे प्रकार वाढल्याचे येथील पोलिस ठाण्यातील नोंदीवरुन दिसून येत आहे. यात प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

67 couples elope and get married in 2 years jalgaon news
Jalgaon Crime News : भांडणाचे कारण उकरत तरुणाला रॉडने मारहाण

त्यामुळे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हे आता खरे ठरू लागले आहे. गायब झालेल्या मुलींमध्ये १४ ते १८ वर्षातील मुलींचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. अगदी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने प्रेमात पडून आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

पालकांनी मुलामुलींकडे लक्ष द्यावे

मुली बेपत्ता होणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकला असता, त्यात बहुतांश प्रमाणात त्यांचे पालकही तितकेच जबाबदार असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे. अनेकदा पालकांकडून आपल्या पाल्यांना विश्वासात घेतले जात नाही. कामाच्या गडबडीत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. याचाच गैरफायदा मुले घेताना दिसतात.

मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून दोघेही ‘सैराट’ होतात. त्यामुळे पालकांनी कामातून वेळ काढत आपल्या मुलामुलींना वेळ दिला पाहिजे. त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्यांना प्रेम दिले पाहिजे. केवळ पैशांच्या मागे न धावता, आपले कुटुंब देखील हे विसरता कामा नये, असे पोलिस विभागातील अधिकाऱ्यांचे देखील म्हणणे आहे.

67 couples elope and get married in 2 years jalgaon news
Jalgaon News : जळगाव जिल्‍हा अपघाती मृत्यूसाठी ‘टॉप 5'मध्ये : डॉ. रवींद्रकुमार सिंघल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com