Jalgaon Crime News : यावलला वृद्धाला चौघांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Jalgaon Crime News : यावलला वृद्धाला चौघांकडून मारहाण

यावल (जि. नाशिक) : शहरातील देशमुखवाडा भागात असलेल्या विवरेवाले महाराज मंदिरात ढोलकी वाजविण्यास दिली नसल्याचा राग येऊन एका ६८ वर्षीय व्यक्तीला चौघांनी मारहाण (Beating) करून जबर दुखापत केली. (68 year old man was beaten by people jalgaon crime news)

या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील देशमुखवाड्यात विवरेवाले महाराज मंदिर आहे. या मंदिरात श्रावण शंकर भिल (वय ६८) हे होते. तेथे इंदूबाईचा नातू (नाव माहीत नाही) व त्याच्यासोबत तीन जण असे चार जण आले व त्यांनी या वृद्धास मंदिरातील ढोलक वाजविण्यासाठी मागितली.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्यांनी नकार दिला असता त्याचा राग घेऊन या चौघांनी त्यांना मारहाण केली व लोखंडी पाइप त्यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार नरेंद्र बागुले तपास करीत आहे.