Jalgaon Crime News : टाकरखेडा, बांभोरीत 7 वाळू ट्रॅक्टर पकडले

Jalgaon Crime News : टाकरखेडा, बांभोरीत 7 वाळू ट्रॅक्टर पकडले
esakal

Jalgaon News : येथील प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. १८) पहाटे टाकरखेडा, बांभोरी परिसरात छापा टाकून अवैध वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केले. या धडक कारवाईने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (7 sand tractor seized in Takarkheda Bhambori jalgaon news)

वाळूचे ठेके बंद असतानादेखील वाळूमाफिया गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची अवैधरीत्या वाहतूक करीत होते. प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांना टाकरखेडा व बांभोरी परिसरातून गिरणा नदीच्या पात्रातून रात्रीच्यावेळी वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.

प्रांताधिकारी गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्यासह नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, किशोर माळी, दिलीप पाटील, मंडळ अधिकारी मनोज शिंपी, लिपिक पंकज शिंदे, तलाठी सलमान तडवी, सुरेश कटारे, पंकज भोई, आरिफ शेख, राहुल देरंगे, कोतवाल मधुकर पाटील, पंकज सोनवणे यांनी गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास टाकरखेडा, बांभोरी परिसरात अचानक गस्त घालून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सात वाहनांविरोधात कारवाई करून ताब्यात घेतले.

सातही ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. दरम्यान, महसूल पथकास पाहताच वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांनी वाहने पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चार ट्रॅक्टरचालकांनी महसूल पथकासमोरच ट्रॅक्टरमधील वाळू रस्त्यावरच टाकून दिली तर तीन ट्रॅक्टर वाळूने भरलेले सापडले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Crime News : टाकरखेडा, बांभोरीत 7 वाळू ट्रॅक्टर पकडले
Banana Crop Insurance : केळीच्या नुकसानीपोटी मिळणार प्रतिहेक्टर 'इतक्या' रुपयांचा लाभ

या प्रकरणी हिरामण सोनवणे (एमएच १९ : ३८६०), जितेंद्र नन्नवरे (एमएच १९ : ९५०१), ज्ञानेश्‍वर नन्नवरे (एमएच १९ : एडी ६७६९), सतीश सपकाळे, दिनेश नन्नवरे (दोन ट्रॅक्टर), विलास कोळी, राहुल कोळी (सर्वांचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर) यांची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. प्रांताधिकारी गायकवाड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, त्यांनी केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.

उत्राण परिसरातून देखील वाळूची चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असून, या ठिकाणी देखील कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढील काळात देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी गायकवाड, तहसीलदार चव्हाण यांनी दिला आहे.

Jalgaon Crime News : टाकरखेडा, बांभोरीत 7 वाळू ट्रॅक्टर पकडले
Road Construction : सरकारी काम अन् बारा महिने थांब! भडगाव तालुक्यात शेतरस्त्यांची कामे रखडली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com