Jalgaon Crime News : ‘त्या’ नराधमाची पोलिस कोठडीत रवानगी

7 year old girl Murderer sent to police custody Jalgaon Crime News
7 year old girl Murderer sent to police custody Jalgaon Crime Newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : गोंडगाव (ता. भडगाव) येथील सातवर्षीय बालिकेवर जबरी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अटकेतील संशयित सोनू ऊर्फ स्वप्नील पाटील याची जिल्‍हा न्यायालयाने पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. (7 year old girl Murderer sent to police custody Jalgaon Crime News)

भडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंडगावात सातवर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. चार दिवसांनंतर घराजवळील खळ्यात कडब्याच्या गंजीत तिचा मृतदेह आढळून आला होता.

या प्रकरणी स्वप्नील ऊर्फ सोनू याला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याला शुक्रवारी (ता. ४) जळगाव जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

7 year old girl Murderer sent to police custody Jalgaon Crime News
Jalgaon Crime News : त्या बालगृहातील मुलीवर अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल

न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात संशयिताच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. सुरेंद्र काबरा यांनी गुन्ह्यातील अचूक तपास आणि पुरावे संकलित करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी लावून धरली.

न्यायालयाने सरकार पक्षाची मागणी ग्राह्य धरून संशयित सोनू ऊर्फ स्वप्नील विनोद पाटील याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

7 year old girl Murderer sent to police custody Jalgaon Crime News
Jalgaon Crime : जळगाव हादरलं! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत दगडानं हत्या; चिमुरडी दोन दिवसांपासून होती बेपत्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

70-year-old woman found murdered in Dindori farm pond
Pimpalwadi case to be fast-tracked; chargesheet by September 2.
MLA सचिन कल्याणशेट्टी
Assam News, Hailakandi News
Marathi News Esakal
www.esakal.com