Gram Panchayat Election : कजगाव ग्रामपंचायतीत 77.91 टक्के मतदान; नवरदेव- नवरीने बजावला मतदाचा हक्क

Congestion in the polling station premises of Zilla Parishad school.
Congestion in the polling station premises of Zilla Parishad school.esakal

कजगाव (जि. जळगाव) : भडगाव तालुक्यात सर्वांत मोठी व चर्चेत असलेल्या कजगाव ग्रामपंचायतीत आज ७७.९१ टक्के मतदान झाले. सहा वार्ड मिळून ६ हजार ५९ इतके मतदान आहे. त्यापैकी तब्बल ४ हजार ७२१ इतके मतदान झाले. यात तरूणांची संख्या लक्षवेधी ठरली तर महिला, पुरुष व वृद्धांनी देखील मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. (78 percent voting in Kajgaon Gram Panchayat Election jalgaon news)

वृद्धा मतदाराला मतदान केंद्रावर नेताना तरुण.
वृद्धा मतदाराला मतदान केंद्रावर नेताना तरुण.esakal

आज सकाळी साडेसातपासूनच मतदान केंद्रात मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. गर्दीचा ओघ मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सुरूच होता. किरकोळ वाद वगळता दिवसभर शांततेत मतदान पार पडले. यासाठी चार अधिकाऱ्यांसह तब्बल पंचवीस पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

कजगाव ग्रापंचायतीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडली. लोकनियुक्त सरपंचपदासाठी दिनेश पाटील, रघुनाथ महाजन, वसुधा पाटील व लालसिंग पाटील असे चार उमेदवार उभे आहेत. सदस्यांच्या सतरापैकी एक जागा बिनविरोध झाल्याने सहा वार्डातील सोळा जागेसाठी ३६ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.

त्यामुळे मतदान केंद्राला दिवसभर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने मतदान केंद्राला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, भडगावचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, पाचोऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप चिंचोले, नोडल अधिकारी वाय. एल. ब्राह्मणे, कजगावचे तलाठी विजय पाटील, पोलिस पाटील राहुल पाटील, कोतवाल नितीन मोरे, कजगाव पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक छबुलाल नागरे, कर्मचारी जिजाबाराव पवार, नरेंद्र विसपुते, गणेश कुमावत आदी या ठिकाणी उपस्थित होते.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Congestion in the polling station premises of Zilla Parishad school.
Grapes News : द्राक्ष विक्रीसाठी बाजारात दाखल; चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
विवाह पार पडताच मतदान बजावण्यासाठी आलेले वर- वधू.
विवाह पार पडताच मतदान बजावण्यासाठी आलेले वर- वधू.esakal

नवरदेव नवरीने बजावला हक्क

एकीकडे लग्नाची लगीनघाई तर दुसरीकडे ग्रामपंचायतीचे मतदान अशा घाईगडबडीत कजगाव येथील नवदाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. कजगाव येथील बांधकाम व्यवसायिक रावसाहेब महाजन यांचे चिरंजीव मयूर व शिक्षक असलेले दिनेश महाजन यांची कन्या प्राजक्ता यांचा आज विवाह होता. शुभ विवाहाचे कर्तव्य पार पाडून वधु-वराने लागलीच मतदान करून लोकशाहीचे कर्तव्य बजावले. त्यामुळे गावात मतदानासोबतच या वधुवराच्या मतदानाची चर्चा होती.

मतदानाची टक्केवारी वाढली

दरम्यान, सकाळी साडेसातपासून ते थेट संध्याकाळी साडे पाचपर्यंत गर्दी दिसून आली. गर्दीचा ओघ इतका होता, की प्रत्येक बुथवर मतदारांची रांग दिसून आली. दुपारी दीडपर्यंत तब्बल ४१ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतरही गर्दी सुरुच होती. त्यामुळे एकूण मतदानापैकी ७७.९१ टक्के मतदान झाले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचे मतदान अधिक झाल्याने सर्वांना निकालाची उत्सुकता आहे.

Congestion in the polling station premises of Zilla Parishad school.
Gram panchayat Election : येवला तालुक्यात शेती कामातून वेळ काढत मतदार राजा मतदानासाठी केंद्रावर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com