
जळगाव जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या उरकल्या
जळगाव: जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाने एकूण ७९ टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. एकूण पेरणीच्या ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) कापसाचा पेरा झाला आहे, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
यंदा जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला. जूनमध्ये एकदा जोरात पाऊस झाला. नंतर पावसाने ओढ दिली. पहिल्या जोरदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र नंतरच्या ओढीने दुबार पेरणीचे संकट उभे होते. जुलैत मात्र चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या उरकण्यावर भर दिला आहे. खरीपाचे एकूण क्षेत्र यंदा ७ लाख ७० हजार ८७४ हेक्टर होते.
त्यापैकी आतापर्यंत ६ लाख ११ हजार ५०९ हेक्टवर (७९ टक्के) पेरण्या झाल्या आहे. कपाशीचा विचार करता कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९८ हजार ९२५ हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ९३ हजार ६२८ हेक्टरवर (९९ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. त्यातील कोरडवाहू पेरण्या २ लाख ७४ हजार ५८४ हेक्टरवर तर बागायती पेरण्या २ लाख १९ हजार ४४ हेक्टरवर झाल्या आहेत.
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा
तालुका टक्के
जळगाव- -७२ टक्के
भुसावळ- -६१
बोदवड- -९२
यावल --६७
रावेर- -७१
मुक्ताईनगर- -७७
अमळनेर- -८५
चोपडा- -७२
तालुका टक्के
एरंडोल- -८८
धरणगाव- -७८
पारोळा- -९९
चाळीसगाव-- ६९
जामनेर-- ९४
पाचोरा --७२
भडगाव --८१
एकूण ७९
Web Title: 89 Sowing Of Kharif Completed In The Jalgoan District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..