Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात अवकाळीने 905 हेक्टरच नुकसान; हरभऱ्यासह कांद्याचा समावेश

905 hectare crop damage due to unseasonal rain in district jalgaon news
905 hectare crop damage due to unseasonal rain in district jalgaon news esakal

Jalgaon Unseasonal Rain Damage : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता.२६) व सोमवारी (ता.२७) झालेल्या गारपीट अन अवकाळी पावसाने खरिपासह रब्बी पिकांचे एकूण ९०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मंगळवारी (ता. २८) सादर करण्यात आला आहे.(905 hectare crop damage due to unseasonal rain in district jalgaon news )

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने एकूण १०६ गावातील शेतकऱ्यांचे कापूस, कांदा, केळी, हरभरा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यात जामनेरमधील ९९, भुसावळमधील १९४, बोदवडमधील १००.३५, चाळीसगावमधीस ४४६, एरंडोलमधील ५, भडगावमधील १५४, पाचोरामधील ७ हेक्टरचा समावेश आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. रब्बी पिकांच्या पेरण्यांना आता वेग येणार आहे. आत्तापर्यंत रब्बीची २५ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

905 hectare crop damage due to unseasonal rain in district jalgaon news
Nashik Unseasonal Rain Damage: येवल्याच्या उत्तर भागात कोट्यवधीचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

गारठ्यात वाढ

दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात गारठा पसरला आहे. दुपारपर्यंत सूर्यनारायणाचे दर्शन घडलेले नाही. सकाळच्या प्रहरी सर्वत्र धुक्याची चादर ओढलेले वातावरण असते. नागरिकांना उबदार कपडे परिधान करून व्यवहार करावे लागतात.

गारठ्यापासून सुटका होण्यासाठी चहाचा आस्वाद घेतला जात आहे. काही ठिकाणी रात्री शेकोटी पेटवून विविध विषयांवरील गप्पा रंगताहेत. येत्या पाच डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

905 hectare crop damage due to unseasonal rain in district jalgaon news
Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव : मंत्री अनिल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com