
''पिंटूमामाने घरात बोलावून केले असे...'' अल्पवयीनने मांडला घटनाक्रम
जळगाव : आसोदा येथील दहावर्षीय पीडितेस लहान मुलाकरवी घरात बोलावून अत्याचार केल्याप्रकरणी संशयिताला पाच वर्षे सश्रम कारावास व १५ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने बुधवारी (ता. ११) सुनावली.
तिच्यावर नजर पडली आणि...
आसोदा (ता. जळगाव) येथील वाल्मीकनगरातील आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू धुडकू खंबायत याची १ फेब्रुवारी २०१८ ला दुपारी तीनला गल्लीत खेळत असलेल्या दहावर्षीय बालिकेवर वाईट नजर पडली. त्याने लहान मुलाला सांगून पीडितेस घरात बोलावून घेतले. लहान मुलगा स्वप्नील आणि त्याच्या मुलीला चॉकलेट घेण्यासाठी पाठवून पीडितेशी अंगलट करत तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड करत घरातून पळ काढला. शेजारील महिला जिजाबाईला त्या मुलीने घटनेची माहिती दिली. सायंकाळी पीडितेची आई शेतातून परतल्यावर घडला प्रकार कळताच ग्रामस्थांनी आरोपी श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू खंबायत याच्या घरावर धडक देत विचारणा केली. मात्र, त्याने पलायन केले. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशेाक रत्नपारखी यांनी महिला सहाय्यक निरीक्षक सुप्रिया देशमुख यांना पाचारण करून मुलीच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा: तो‘ वैवाहिक बलात्कार मानावा का, याबाबत न्यायमूर्तींतच मतभिन्नता
असे कलम, अशी शिक्षा
- कलम ३५४ (अ) : विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सश्रम कारावास, १५ हजार दंड
- कलम- पॉक्सो : सात-आठ बालकांचे लैंगिक शोषण, तीन वर्षे सश्रम कारवास, १५ हजार दंड
- कलम - पॉक्सोच्या ९(एम)(पी) अंतर्गत : पाच वर्षे सश्रम कारावास, १५ हजार दंड, दंड न भरल्यास प्रत्येक कलमनिहाय तीन महिने साध्या कैदेची शिक्षा
सात साक्षीदारांच्या साक्ष
न्या. एस. एन. माने यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी अभियोक्ता ॲड. अनुराधा वाणी यांनी पीडितेची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविली. त्यात घटनेच्या दिवशीचा हुबेहुब घटनाक्रम या चिमुरडीने मांडला. पीडितेची आई, आरोपीच्या तावडीतून सुटून बाहेर पडल्यावर पहिल्यांदा घटना सांगितली त्या जिजाबाई, गुन्ह्याचे तपासाधिकारी, निरीक्षक अशोक रत्नपारखी अशांसह एकूण सात साक्षीदरांच्या महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आल्यात. पीडितेने दिलेल्या साक्षीवरून श्रीकृष्ण ऊर्फ पिंटू धुडकू खंबायत याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.
हेही वाचा: मद्याच्या नशेत गेला झोल; गोलाणीत छतावरून पडून तरुण ठार
Web Title: Abuse Of A Minor Girl In Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..