

Jalgaon Officer Caught Taking Bribe
Esakal
Jalgaon Officer Caught Taking Bribe: जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. या छाप्यात कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे. सतीश मन्सुलाल शिसोदे असं अधिकाऱ्याचं नाव आहे. अवघ्या दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेण्यात आली. या तपासात तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळली आहे.