भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले; ट्रक पलटताच युवक युवकाचा मृत्यू   

अल्हाद जोशी
Saturday, 2 January 2021

पोलिस व शहरातील युवकांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करून मृत युवकाचा मृतदेह बाहेर काढला. 

एरंडोल : चोपडा येथून कापसाच्या गाठी घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटून झालेल्या अपघातात ३२ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रकमालक व चालक किरकोळ जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (ता. १) रात्री साडेअकराच्या सुमारास धरणगाव रस्त्यावरील टोळी गावाजवळ असलेल्या समर्थ नर्सरीजवळ झाला. 

ट्रकचा क्लीनर ट्रक पलटताच त्याखाली दाबला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस व शहरातील युवकांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करून मृत युवकाचा मृतदेह बाहेर काढला. 

चोपडा येथून शुक्रवारी (ता. १) रात्री साडेअकराच्या सुमारास कापसाच्या गाठी घेऊन येणाऱ्या ट्रक (एमएच १९, झेड ३५९५) चालकाचा ट्रॅकवरील ताबा सुटल्याने ट्रक टोळी गावाजवळील समर्थ नर्सरीजवळ उलटला. अपघातात ट्रकचा क्लीनर लायक युनूस पिंजारी (वय ३२) (रा. एरंडोल) हा जागीच ठार झाला तर ट्रकमधील हितेंद्रसिंग मधूसिंग परदेशी (वय ४२) (रा. एरंडोल) व मनोज श्रावण मराठे (रा. एरंडोल) हे दोघे जण जखमी झाले. ट्रकचा क्लीनर लायक पिंजारी हा ट्रक व कापसाच्या गाठीखाली दाबला गेला होता. याबाबत हितेंद्रसिंग परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक मनोज मराठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विकास देशमुख पुढील तपास करीत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accident marathi news erondal jalgaon fast truck one person dies