Eknath Khadse
Eknath Khadsesakal

Eknath Khadse : यापुढे निवडणूक लढणार नाही! ; खडसे यांचे प्रतिपादन,राजकारणात सक्रिय राहणार

गेल्या चार दशकांपासून सक्रिय राजकारणात आहे.. राजकारण हाच आपला पिंड असून त्यापासून दूर जाऊ शकत नाही. मात्र, विधानसभा अथवा अन्य कुठलीही निवडणूक मी यापुढे लढविणार नाही’’, अशी भूमिका ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडली.

जळगाव : ‘‘गेल्या चार दशकांपासून सक्रिय राजकारणात आहे.. राजकारण हाच आपला पिंड असून त्यापासून दूर जाऊ शकत नाही. मात्र, विधानसभा अथवा अन्य कुठलीही निवडणूक मी यापुढे लढविणार नाही’’, अशी भूमिका ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मांडली.

जिल्ह्यातील दुसरे ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारली आहे. त्यामुळे याबद्दल खडसेंची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी माध्यमांजवळ स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. या काळात संघटनात्मक आणि संविधानिक अशी विविध पदे भूषविली.

Eknath Khadse
Devendra Fadnavis : काय होतास तू, काय झालास तू : फडणवीस ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचले

आताही मी विधानपरिषदेचा सदस्य आहे. राजकारणापासून दूर जाण्याचा प्रश्‍नच नाही. आपण मरेपर्यंत राजकारणात सक्रिय राहू. मात्र, यापुढे विधानसभा अथवा अन्य कुठलीही निवडणूक लढविण्याची इच्छा आता राहिलेली नाही.’’

लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजप-महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यानिमित्ताने खडसे सध्या त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून अलीकडेच त्यांनी भाजपत प्रवेश करण्याचे नुकतेच जाहीरही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com