Jalgaon Crime News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस 1 वर्षाची शिक्षा

तालुक्यातील दळवेल तांडा येथे महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी संभाजी भिला चव्हाण याला येथील न्यायालयाने सोमवारी (ता. ८) एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अजून एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
Accused sentenced to one year in woman molestation case Jalgaon Crime News
Accused sentenced to one year in woman molestation case Jalgaon Crime Newsesakal

Jalgaon Crime News : तालुक्यातील दळवेल तांडा येथे महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी संभाजी भिला चव्हाण याला येथील न्यायालयाने सोमवारी (ता. ८) एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अजून एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (Accused sentenced to one year in woman molestation case Jalgaon Crime News)

आरोपी संभाजी भिला चव्हाण (रा. दळवेल तांडा, ता. पारोळा) याने १८ जानेवारी २०१७ ला फिर्यादी महिलेच्या घरासमोर तिला धक्का देऊन तिला जमिनीवर फरफटत नेले व लज्जास्पद कृत्य करून तिचा विनयभंग केला.

या गुन्ह्यात भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा केल्याचा दोषारोप संभाजी भिला चव्हाण याच्यावर ठेवण्यात आला होता.

Accused sentenced to one year in woman molestation case Jalgaon Crime News
Akola Crime News : माझं काय चुकलं, मला न्याय मिळेल का?

आरोपी संभाजी भिला चव्हाण याच्यावर न्यायालयात कलम ३५४ प्रमाणे गुन्हा सिद्ध झाल्याने सोमवारी (ता. ८) न्यायाधीश एम. एस. काझी यांनी आरोपी संभाजी भिला चव्हाण (रा. दळवेल तांडा, ता. पारोळा)

याला एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास आणखी एक महिना साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियाेक्ता पी. बी. मगर यांनी युक्तिवाद केला तर या गुन्ह्याचा तपास पारोळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी बाळकृष्ण शिंदे यांनी केला.

Accused sentenced to one year in woman molestation case Jalgaon Crime News
Sambhaji Nagar Crime : जिल्हाभरात चोरट्यांची धूम ; वरखेडीत दिवसा दोन घरे फोडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com