
संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांवर पारोळा पोलिसांकडून कारवाई
पारोळा (जि. जळगाव) : शहरात संशयास्पद (Suspects) स्थितीत भटकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सुलतान खान वकील उस्मानी (रा. आग्रा केळीबाग इस्लामनगर), शब्बीर खान इब्राहिम खान, गोविंदखान शेर मोहम्मद, शाहनवाज खान असपाक खान हे संशयित काहीही एक कारण नसताना भटकताना मिळून आल्याने व त्याचे कारण विचारल्यावर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे दिली गेली नसल्याने पोलिसांनी संशयावरून पोलिस स्टेशनला आणून सखोल विचारपूस केली व त्यानंतर कलम १०९ प्रमाणे कारवाई करण्यात आली. (Action taken by Parola police against the suspects wandering in city jalgaon crime news)
हेही वाचा: एका नाथाच्या बंडाने दुसऱ्या नाथाच्या स्वप्नांवर फिरले पाणी
संशयितांना तहसील कार्यालय, पारोळा येथे तहसीलदार अनिल गवांदे समक्ष हजर केले असता चांगल्या वागणुकीचा फायनल बॉण्ड घेण्यात आला आहे. पारोळा शहरात संशयास्पद स्थितीत भटकणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. वरील नमूद कामगिरी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजित पाटील, राहुल पाटील, राहुल कोळी, हेमचंद्र साबे, पो. ना. प्रवीण पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा: हिंगोणा येक्षील पाणी समस्या कायमची मिटणार
Web Title: Action Taken By Parola Police Against The Suspects Wandering In City Jalgaon Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..