Abhijit Raut latest marathi news
Abhijit Raut latest marathi newsesakal

Jalgaon : बनावट पावत्यांद्वारे टोलवसुलीप्रकरणी कारवाई होणार - जिल्हाधिकारी राऊत

नशिराबाद टोलनाक्यावर बनावट पावत्यांद्वारे टोलवसुलीचा प्रकार अतिशय गंभीर आहे.

जळगाव : नशिराबाद टोलनाक्यावर बनावट पावत्यांद्वारे टोलवसुलीचा प्रकार अतिशय गंभीर आहे. पोलिस तपास करीत आहेत. तपासाअंती संबंधितांवर ठोस कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी दिली. (Latest Marathi News)

Abhijit Raut latest marathi news
सुप्रिया सुळेंचा मोदींशी गुजराती भाषेत संवाद.. ऐकून थक्क व्हाल..

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची मंगळवारी बैठक झाली. या वेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, ‘न्हाई’चे संचालक चंद्रकांत सिन्हा, आरटीओ श्याम लोही आदी अधिकारी उपस्थित होते. बैठकीत रस्ता सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला.

Abhijit Raut latest marathi news
अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच! बंडखोर नेत्यांच्या सूचक शुभेच्छा

नशिराबाद टोलनाक्यावर बनावट पावत्यांद्वारे टोलवसुली होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह पथकाने २१ जुलैला पडताळणी केली. या वेळी हा प्रकार आढळून आला. दरम्यान, टोल पावतीच्या बोगस मशिन जप्त केली. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत. तपासाअंती संबंधितांवर ठोस कारवाई होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com