Employees Strike : संपात सहभागी होऊ नका, अन्यथा... महापालिका प्रशासनाची नोटीस

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

जळगाव : जुनी पेन्शन लागू करा, तसेच इतर मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १४) पासून बेमुदत राज्यव्यापी संप सुरू केला आहे.

मात्र, महापालिकेतील एकही कर्मचारी संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात आले. (administration issued notice to employees that if they participate in strike disciplinary action will be taken jalgaon news)

दरम्यान, संपात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस प्रशासनाने कर्मचाऱ्यांना बजावली आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघटनेने संपात सहभागी होण्याचे अवाहन केले आहे. मात्र, महापालिकेचा एकही कर्मचारी संपात सहभागी नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अस्थापना अधीक्षक लक्ष्मण सपकाळे यांनी सांगितले, की महापालिकेच्या आस्थापनावरील सर्व कर्मचारी कामावर आहेत. एकानेही संपात सहभागी असल्याचे सांगितलेले नाही. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशानुसार आदेश काढले आहेत.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Jalgaon Municipal Corporation
Abhay Yojana : ‘अभय शास्ती’ योजनेत 30 कोटींची वसुली; आज सवलतीचा शेवटचा दिवस!

यात अधिकार व कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होऊ नये. संपात सहभागी अथवा विनापरवानगी गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर गैरवर्तणूक समजून त्याचावर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. संपकाळात सर्व विभागप्रमुखांनी आपले मुख्यालय वरिष्ठांच्या आदेशानुसार सोडू नये, तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याची रजा मंजूर करू नये, असे आदेश काढले आहेत. महापालिकेतील सर्व विभागाचे कामकाज मंगळवारी सुरळीत सुरू होते.

Jalgaon Municipal Corporation
Rajya Kabaddi Spardha : पुणे महिला, पुरुष गटात मुंबई संघ अंतिम विजेता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com