Jalgaon News : ‘लघुपाटबंधारे’चा तुघलकी कारभार; कजगाव बंधाऱ्याची गळती थांबेना!

 on the river Titur Water leaking from the weir.
on the river Titur Water leaking from the weir.esakal

कजगाव (जि. जळगाव) : येथील तितूर नदीवर तयार करण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या पाणी साठवण बंधाऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी गळती होत आहे. नागरिकांनी मागणी करूनही या गळतीकडे संबंधितांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

तर पाणी गळती रोखण्याची जनतेचा रेटा लक्षात घेता ‘लघुपाटबंधारे’चे अधिकारी, अभियंत्यांनी तुघलकी कारभार करत चक्क ओबडधोबड प्लॅस्टिकचे आवरण लावून गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्नही फसला असून गळती सुरूच आहे. (administration of small irrigation dams leakage of Kajgaon dam does not stop plastic cover over the dam spill Jalgaon News)

ठोस उपाययोजना पाणी गळतीसाठी करणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तात्पुरते प्लास्टिक लावून ही गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दुधाची तहान ताकावर भागविण्याचे कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ही पाणी गळती रोखणे खूपच गरजेचे झाले आहे. या पाण्यावर शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अवलंबून आहेत.

हे पाणी असेच वाहत राहिल्यास प्रकल्प फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे कोरडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी संपल्यावर पुढे काय? याचीच चिंता आता सर्वांना लागून आहे. तसेच या के.टी. वेअरवर भोरटेक व अन्य ठिकाणचा पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना देखील फायदा होत असतो. मात्र पाणी शिल्लक राहणार नाही तर फायदा कसा होणार? हे देखील महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

 on the river Titur Water leaking from the weir.
Dhule Crime News: वि‍श्‍वस्तासह कामाठीवर गुन्हा दाखल; आदिवासी सेवा मंडळ संस्थेच्या फसवणुकीचे प्रकरण

गळती थांबवा हो..!

वाढती पाणी गळती लक्षात घेता आतापर्यंत तब्बल चार फुटाच्या जवळपास पाणी वाया गेले आहे. साधारण या पाण्याचा हिशोब लावल्यास त्याची गणना ही लाखो लिटरमध्ये होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले आहे. ही गळती रोखणे खूपच गरजेचे झाले होती.

मात्र या गंभीर बाबीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही, असेच दिसून येत आहे. वाढती गळती रोखण्याचे सोडून त्यावर वाढीव पाट्या टाकून काय उपयोग. त्यामुळे दोन पाट्या कमी टाका, पण ही जलगळती रोखा कारण कितीही पाट्या टाकल्या आणि त्यात पाणीच शिल्लक नसले तर काय उपयोग? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

"कजगाव के. टी. वेअरच्या पाट्या जुन्या, कमकुवत झाल्याने गळती होत आहे. ही गळती रोखण्यासाठी तात्पुरते प्रयत्न सुरू आहेत. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर आहे. मात्र पाणी जास्त असल्याने आता काम करणे शक्य नाही. पाणी कमी झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम करण्यात येईल. पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण होईल."

- जयंत महाजन, उपविभागीय अभियंता, लघुपाटबंधारे विभागा

 on the river Titur Water leaking from the weir.
Jindal Fire Accident: जिंदाल अग्नितांडवातील ढिगाऱ्याखाली एक मृतदेह आढळला! अजूनही 83 कामगार बेपत्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com