Dhule Crime News: वि‍श्‍वस्तासह कामाठीवर गुन्हा दाखल; आदिवासी सेवा मंडळ संस्थेच्या फसवणुकीचे प्रकरण

Fraud
Fraudesakal

धुळे : न्यायप्रविष्ट केसमधून सुटका होण्यासाठी संगनमताने प्रोसिडिंग बुकवरील सर्व सह्या बोगस व बनावट आहेत. शासन व फिर्यादीच्या फसवणुकीच्या उद्देशाने शपथपत्र व प्रोसिडिंग बुकसारखे महत्त्वपूर्ण व मौल्यवान दस्तावेज खोटे व बनावट तयार केले.

याद्वारे ते खरे असल्याचे भासवून संबंधित संस्थेसह शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी साक्री न्यायालयाच्या आदेशाने साक्री तालुक्यातील दोघांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Case registered against Kamathi with wishwasta Tribal Seva Mandal Institution Fraud Case Dhule Crime News)

या प्रकरणी नोंदणीकृत साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळ संस्थेचे विश्‍वस्त शिवाजी जगन्नाथ थानक (वय ७५, रा. वर्धाने, ता. साक्री) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार या संस्थेचा विश्‍वस्त मंगलदास नंदलाल भवरे (वय ८५, रा. मळगाव, ता. साक्री) व डांगशिरवाडे अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेचा कामाठी नितीन प्रभाकर भोसले (वय ८५, रा. पिंपळनेर, ता. साक्री) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

या संस्थेबाबत नाशिकस्थित धर्मादाय सहआयुक्तांकडे चौकशी अर्ज न्यायप्रविष्ट आहे. त्यात कलम ४१/ड अंतर्गत सुरू असलेल्या प्रकरणात मंगलदास भवरे याच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

या प्रकरणातून क्लीन चिट मिळविण्यासाठी संशयित भवरे याने धर्मादाय सहआयुक्तांच्या न्यायालयात बोगस व बनावट हरकत अर्ज तयार करून त्यावर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष के. एस. देवरे यांची ओसी म्हणून बोगस ब बनावट सही केली. खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

Fraud
Health Department Recruitment : पीबी बीएसस्सी नर्सिंग उमेदवारांना डावलले

संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांना पिंपळनेर येथील गट क्रमांक १२१४/२ जमिनी विक्री व त्यावरील बांधकाम या व्यवहारातून नाव वगळण्याबाबत खोटा व बनावट अर्ज दिला. तसेच एका ठराव क्रमांक दोनमध्ये व मंगलदास भवरे याला त्याच्या हरकतीनुसार १२९४/२ जमीन विक्री व बांधकाम या व्यवहारातून वगळण्यात यावे, असे संशयित भवरे व भोसले यांनी संगनमत करत भोसले याने त्याच्या हस्ताक्षरात बोगस व बनावट ठराव तयार केला.

यातून कलम ४१/ड च्या केसमधून सुटका होण्यासाठी शासन व फिर्यादीची फसवणूक केल्याने संशयित भवरे व भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे तपास करीत आहेत.

Fraud
Nashik Crime News : 50 लाख उकळूनही सावकाराकडून 20 लाखांची मागणी; गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com