Gold Silver Prices After Budget : ‘बजेट’नंतर सोने, चांदीच्या दरात घसरण सुरूच; सद्या या आहेत किमती

महिन्याभरात सोने १,५००, तर चांदी चार हजारांनी घसरली
Silver And Gold Rate
Silver And Gold Rate esakal

जळगाव : सोने, चांदीत केलेली गुंतवणूक लागलीच रोकड देणारी मानली जाते. सोने, चांदी मोड दिली, की मिळालेल्या पैशांतून नागरिक आपली आर्थिक गरज पूर्ण करतात. यामुळे सोन्यात दर वर्षी गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र आहे.

सध्या सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू असल्याने आणखी किती दर घसरतात, याची नागरिक वाट पाहत आहेत. केंद्रीय अंदाजपत्रकानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी सोने, चांदीच्या दरात वाढ झाली होती.

सोन्याच्या दरात प्रतितोळ्यामागे ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांची वाढ झाली होती. महिन्यानंतर मात्र सोन्यात एक हजार ५००, तर चांदीत चार हजारांनी घसरण झाली आहे. (After union Budget 2023 gold silver prices continue to fall jalgaon news)

बजेटनंतर सोने, चांदीचे दर वाढतच जातील, असे चित्र होते. मात्र, अंदाजपत्रकानंतर दहा दिवसांनंतर सोन्याचे दर तसेच राहिले. मात्र, चांदीच्या दरात तब्बल पाच हजारांची घसरण झाली होती.

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. जानेवारीत सोन्याच्या दरात एक हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५८ हजार ८०० वर पोचला होता.

चांदीचा दर ‘जीएसटी’सह ७२ हजार १०० वर पोचला होता. गेल्या महिन्यात सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ५९ हजार १२२ रुपये, तर चांदीचा दर ७१ हजारांपर्यंत खाली आला.

शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा कल सोने खरेदीकडे वाढत आहे. अधिकतर ग्रामीण भागातील महिलांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो, तो गुंतवणूक म्हणून. शहरी भागातील महिलाही गुंतवणूक अधिक फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात.

भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी एक हजार १०० ते एक हजार २०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Silver And Gold Rate
Agni Veer Recruitment | ‘अग्निवीर’साठी नोंदणी करा : जिल्हाधिकारी शर्मा

बजेटपूर्वी सोने ७४ हजार ४०० (विनाजीएसटी) प्रतितोळा होते. बजेटनंतर ते ५८ हजार २०० झाले. नंतर त्यात एक हजार २०० रुपयांची घसरण होऊन ५७ हजारांवर आले होते. रविवारी (ता. २६) त्यात पुन्हा घसरण झाली. सोने ५५ हजार ९०० (जीएसटीविना), तर चांदी ६५ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आली आहेत.

गेल्या काही दिवसांतील सोने, चांदीचे दर (विनाजीएसटी)

तारीख -- सोने प्रतितोळे -- चांदी प्रतिकिलो

२८ जानेवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

१ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६९ हजार

२ फेब्रुवारी -- ५८ हजार २०० -- ७२ हजार

४ फेब्रुवारी -- ५७ हजार -- ६९ हजार

१२ फेब्रुवारी -- ५७ हजार ४०० -- ६७ हजार

१७ फेब्रुवारी -- ५६ हजार ३०० -- ६६ हजार

२६ फेब्रुवारी -- ५५ हजार ९०० -- ६५ हजार ५००

Silver And Gold Rate
Bhopal Dog Show : नाशिक शहर पोलिसांचा ‘गुगल’ ठरला Best Dog! दुसऱ्यांदा सन्मान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com