esakal | जळगाव विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमान आकाशात झेपावणार    ​

बोलून बातमी शोधा

जळगाव विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमान आकाशात झेपावणार     ​}

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी विविध अडथळे येत आहे.

जळगाव विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमान आकाशात झेपावणार    ​
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, या अडथळ्यात विविध प्रकारच्या अडचणी येत असल्याने त्या दूर करण्याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी सूचना दिल्या आहेत. 

आवश्य वाचा- पदाधिकारी राष्ट्रवादीचा, गमछा भाजपचा आणि प्रवेश सत्कार मनपा अधिकाऱ्यांचा; काय आहे हा प्रकार? जाणून घ्या  
 

खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव विमानतळ येथे विमानतळ बांधकाम विभागीय अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक यांच्यासमवेत सल्लागार समितीची बैठक घेतली. बैठकीस विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य तथा पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, विभागीय विमानतळ बांधकाम अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, जळगाव विमानतळाचे संचालक सुनील मोंगीरवार यांच्यासह विमानतळावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

जळगाव-पुणे सुविधा 
जळगाव ते पुणे सुविधेबाबतही बैठकीत चर्चा झाली. याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना खासदारांनी बैठकीत संचालकांना दिल्या. 

आंतरराष्ट्रीय सुविधा 
विमानतळ प्राधिकरणाने जळगाव विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार, नवीन टर्मिनल बिल्डिंगसह कार्गो टर्मिनल बिल्डिंग, विमानासाठी स्वतंत्र पार्किंग आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी विविध अडथळे येत असून, नशिराबाद ते कुसुंबा या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने एक कोटी चार लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. विमानतळाबाहेर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, महामार्ग प्रशासनाकडून बाहेरील पार्किंगसह इतर सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आवर्जून वाचा- सुपरफास्ट विशेष गाड्यांचा विस्तार; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक जलदगतीने
 

अजिंठ्यासाठी हेलिकॉप्टर 
जळगाव येथून सध्या मुंबई आणि अहमदाबाद विमानसेवा सुरू आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना तत्काळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाता यावे, यासाठी जळगाव ते अजिंठा हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याबाबत जळगाव विमानतळ प्रशासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी अजिंठा येथील हेलिपॅडची जागा राज्य शासनाच्या महाराष्ट्र पर्यटन विभागाकडे असून, ही जागा त्यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाला देण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक अखिलेश शुक्ला यांनी सहमती दर्शविली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे