Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवावी जिल्हा बँक : अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar statement about district bank work for farmer jalgaon news

Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवावी जिल्हा बँक : अजित पवार

जळगाव : जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी समन्वयाने काम करा. त्याद्वारे जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवावी, असे अवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (Ajit Pawar statement about district bank work for farmer jalgaon news)

जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पवार यांनी मुबंई येथे श्री. पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा दूध संचालक रोहित निकम उपस्थित होते. अजित पवार यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय पवार यांचे स्वागत केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

त्यानंतर बॅकेच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. ते म्हणाले की, जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे. ती शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवावी. समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. यानंतर बँकेचे अध्यक्ष पवार यांनी राज्याचे सहकार राज्यमंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली.

शासनाकडे असलेल्या बँकेच्या काही प्रलंबीत प्रश्‍नांबाबत त्यांना माहिती दिली. त्यावेळी हे प्रश्‍न सोडविण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले. चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यावेळी उपस्थित होते.