Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला सोन्यासाठी वेटींग; वाहनांसह मोबाईल इलेक्ट्रानिक वस्तूंना मागणी..

gudi padwa 2023 rush to buy gold in bullion market jalgaon news
gudi padwa 2023 rush to buy gold in bullion market jalgaon newsesakal

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि हिंदू नववर्षाची सुरवात असलेल्या गुढीपाडव्यासाठी (Gudi Padwa 2023) शहरातील सराफा बाजारात बुधवारी (ता. २२) सोने खरेदीसाठी सकाळी, सायंकाळी गर्दी झाली होती. (gudi padwa 2023 rush to buy gold in bullion market jalgaon news)

सोन्याच्या दरात सहाशे रुपयांची घसरण झाल्याने मुहूर्तावर सोने खरेदीसाठी काही शो-रूममध्ये ग्राहक वेटींगवर असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गुढीपाडव्याला लग्नसराईच्या अनुषंगाने तयार दागिन्यांसह वेढणी, कॉइन, मणीमंगळ सूत्र, कानातील डूल, नाकातील नथ, अंगठी आदी दागिन्यांना अधिक मागणी होती.

सोन्याचे दर केव्हा वाढतील व केव्हा कमी होतील, हे सांगता येत नाही. सोन्याचे बिस्कीट खरेदी केल्यास त्यात विक्रीवेळी होणारी घट होत नाही. यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्याच्या बिस्किटाला बुधवारी चांगली मागणी होती. ज्येष्ठांचा चोख सोने, तर तरुणाईंचा कमी वजनाचे, हिऱ्याचे दागिने खरेदी करण्याकडे कल होता.

सोने सुरक्षित गुंतवणूक, तसेच चांगले रिटर्न देत असल्याने सोने महागले, तरी नागरिकांनी खरेदी केली. दुपारी अचानक सहाशे रुपयांची घसरण सोन्याच्या दरात झाल्याने दुपारनंतर सोने खरेदीसाठी ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागल्याचे चित्र आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये पाहावयास मिळाले. सकाळी दर ६९ हजार रुपये प्रतितोळा होते. दुपारनंतर त्यात सहाशेची घसरण होऊन ते ६८ हजार ४०० वर (विना जीएसटी) आले. यामुळे ग्राहकांचा सहाशे रुपयांचा फायदा झाला.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

gudi padwa 2023 rush to buy gold in bullion market jalgaon news
Jalgaon News : जळगावकरांना किफायतशीर किमतीत घरे; बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ

इलेक्ट्रानिक वस्तू खरेदीसाठी गर्दी

सोन्याच्या दागिन्यांसोबतच इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, फर्निचर, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी, मोबाईल, ओव्हन, कॅमेरा आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची दिवसभर गर्दी पाहावयास मिळाली.

कार खरेदीवर आकर्षक सूट

दुचाकी, चारचाकी खरेदीवरही आकर्षक सूट, ऑफर्स दिल्याने विविध वाहनांच्या शोरूममध्ये बुधवारी वाहन खरेदीसाठी गर्दी झाली होती. काहींनी अगोदरच वाहनांचे आरक्षण केले होते. त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाऊन वाहन घरी आणले. नवीन वाहन घेतल्याचा आनंद संबंधितांच्या घरी पाहावयास मिळाला. गुढीपाडव्यानिमित्त एसी आणि कुलरला मागणी होती.

"गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी सकाळपासून गर्दी होती. दुपारी भाव कमी झाल्यानंतर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. अनेकांना सोने खरेदीसाठी ‘वेटींग’ करावी लागली. पारपंरिक दागिन्यांसोबतच नवीन डिझाईन, लाईटवेटेड दागिन्यांना मागणी होती." -मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स

gudi padwa 2023 rush to buy gold in bullion market jalgaon news
Gudi Padwa 2023 Gold Rate: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या चांदीला पुन्हा झळाळी; जाणून घ्या दरवाढ..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com