फैजपूरच्या आकाशची भरारी, 13,500 फुटांवरून केलं 'स्काय डायव्हिंग'

फैजपूरच्या आकाशची भरारी, 13,500 फुटांवरून केलं 'स्काय डायव्हिंग'
Summary

ही कामगिरी आकाशने यशस्वीपणे पार पाडली आहे. पुन्हा एकदा भारतीय युवकाने आपला ठसा अमेरिकेत उमटवला आहे.

फैजपूर (जळगाव) : येथील आकाश मनोजकुमार पाटील (Akash Manojkumar Patil) या युवकाने अमेरिकेतील स्याडी यगो (sadie yago) येथे सुमारे १३ हजार ५०० फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग (sky diving) करून एक चित्तथरारक कामगिरी केली आहे. हा अत्यंत धाडसी असा प्रकार असून, भारतीय युवकांना ही कामगिरी निश्चित प्रेरणादायी ठरेल. (Akash patil from faizpur has done sky diving at sadie yago in USA)

फैजपूरच्या आकाशची भरारी, 13,500 फुटांवरून केलं 'स्काय डायव्हिंग'
‘फैजपूर काँग्रेस’चा सुवर्णमहोत्सव अन्‌ भिलारे गुरुजींचे योगदान

आकाश हा फैजपूर येथील दादासाहेब वसंतराव पाटील औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील यांचा मुलगा आहे. त्याने अमेरिकेत एम.एस.अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली असून, तेथे उच्च सेवेत आहे. त्याच्या या धाडसी कामगिरीस आई वैशाली पाटील व वडील मनोजकुमार पाटील यांचे सदैव मार्गदर्शन व प्रेरणा मिळत आहे. ही कामगिरी करताना विमानाने १३ हजार ५०० फूट उंचीवर जाऊन विमानातून बलूनच्या सहाय्याने बाहेर पडून अवकाशात झेप घेऊन स्काय डायव्हिंग केले. जीव धोक्यात घालून डायव्हिंग करावे लागते. ही कामगिरी आकाशने यशस्वीपणे पार पाडली आहे. पुन्हा एकदा भारतीय युवकाने आपला ठसा अमेरिकेत उमटवला आहे.

फैजपूरच्या आकाशची भरारी, 13,500 फुटांवरून केलं 'स्काय डायव्हिंग'
दिलासादायक.. जळगाव जिल्ह्यात बाधितांची संख्या सहाशेच्या टप्प्यात !

या धाडसी कामगिरीबद्दल आकाशचे मसाका संचालक नरेंद्र नारखडे, डॉ. गिरीश लोखंडे, डॉ. ए. के. जावळे, अमूल्य डहाणूकर, डॉ. पद्माकर पाटील, लक्ष्मी सॉ मिलचे संचालक अनिल नारखेडे, औद्योगिक वसाहत संचालक मंडळ, श्री लक्ष्मी नागरी पतसंस्था संचालक मंडळ, सातपुडा पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, योगेश भावसार, नितीन राणे, भास्करराव चौधरी, पंडित कोल्हे, शेखर चौधरी यांनी अभिनंदन केले. (Akash patil from faizpur has done sky diving at sadie yago in USA)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com