esakal | अर्ध्यातून मोडला वीज खांब अन् मृत्यू राहिला दोन हात लांब
sakal

बोलून बातमी शोधा

light pole

अर्ध्यातून मोडला वीज खांब अन् मृत्यू राहिला दोन हात लांब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" या उक्तीचा प्रत्यय आज सकाळी साडेनऊच्या सुमारास फापोरे रस्त्यावर दिसून आला. अमळनेर आगाराची एम एच ४० एन ९०८१ या क्रमांकाची बस अमळनेर हुन बहादरपूर कडे जात होती. येथील खळेश्वर मंदिराजवळील फापोरे रस्त्यावरील सोहम नगर मध्ये काही वीजतारा व केबल या लोंबकळत होत्या. मात्र अनावधानाने ही बाब बस चालकाच्या लक्षात न आल्याने या वीज तारा व केबल बसच्या वरच्या भागात अडकल्या.

काही अंतर ते फरफटत नेल्याने सिमेंटच्या वीज खांब अर्ध्यात काही भाग तुटला. पर्यायाने तो वाकला मात्र वीज खांब खाली न पडल्याने पुढील अनर्थ टळला. कारण त्या वेळी वीज प्रवाह सुरू होता. बस चालकाने वेळीच ब्रेक लावला नसता तर वीज प्रवाह बस मध्ये उतरला असता. यावेळी अनेक नागरिक ये जा ही करीत होते. या बसमध्ये अनेक प्रवासी बसले होते. जर विजेचा धक्क्याने मोठा अनर्थ होऊ शकत होता. मात्र "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" याच गोष्टीचा प्रत्यय या घटनेतून दिसून आला.

हेही वाचा: यवतमाळ : 'फल्ड लाईट’ने लखलखणार नेहरू स्टेडीयम

सकाळ चे बातमीदार उमेश काटे यांच्या डोळ्यादेखत ही घटना घडत होती. अर्धा लोंबकलेला सिमेंटचा वीज खांब धोकेदायक ठरत होता. वीज प्रवाह बंद करणे व धोकेदायक वीज खांब काढणे हे आताच्या क्षणी होणे गरजेचे होते. यासाठी त्यांनी लागलीच ही बाब पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांना सांगितली. त्यांनी त्याची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला दुरूस्ती बाबतच्या सूचना दिल्या. क्षणाचा ही विलंब न करता वीज खांब दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. पावसाच्या सरीतही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही तासात ते काम पूर्ण करून वीज पुरवठा सुरळीत केला.

loading image
go to top