Jalgaon News : आमदारांचे आरोप बिनबुडाचे, मतदारांची दिशाभूल; अमोल शिंदेंचा आरोप

Amol Shinde allegations of misleading voters jalgaon news
Amol Shinde allegations of misleading voters jalgaon newsesakal

Jalgaon News : पाचोरा- भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर पाटील हे मेळावे व पत्रकार परिषदांमधून बिनबुडाचे आरोप करत असून, त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, पुराव्यासह बोलावे व एका व्यासपीठावर येऊन पुरावे दाखवून आरोप सिद्ध करून दाखवावे, उगीच मतदारसंघाची दिशाभूल करू नये, असे खुले आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी पत्रकार परिषदेत केले. (Amol Shinde allegations of misleading voters jalgaon news)

बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक व या निवडणुकीत भाजप प्रणीत शेतकरी सहकार पॅनल तसेच गेल्या काही दिवसांपासून आमदार किशोर पाटील करीत असलेले बिनबुडाचे आरोप या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी अमोल शिंदे यांनी सर्व पदाधिकारी व उमेदवारांसह भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

या वेळी भडगावचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी शेतकरी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांचा परिचय करून दिला. या वेळी बोलताना अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी सहकार पॅनलमध्ये सर्वसामान्य उमेदवार असून, एकही व्हाइट कॉलर नसल्याने आम्ही सर्व जागा जिंकणार आहोत.

आमदारांनी रेटून खोटे बोलणे बंद करावे. बाजार समितीची जागा ४० हजार स्क्वेअर फूट नसून ही जागा फक्त २८ हजार स्क्वेअर फूट आहे व ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी आमदार किशोर पाटील यांचीच सत्ता होती. बोली बोलणाऱ्यांमध्ये त्यांचाही एक सहकारी होता. त्यांना कमी किमतीत जागा घ्यायची होती, परंतु मी जास्त बोली बोलून बाजार समितीचे उत्पन्न वाढवले. हा व्यवहार झाला त्यावेळी मी राजकारणातही नव्हतो.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Amol Shinde allegations of misleading voters jalgaon news
Jalgaon News : अमृत, भुयारी गटारी योजनेचे धोरण ठरवा; महासभेत मागणी

आमदारांना बाजार समितीची जागा का विकावी लागली? हा मूळ मुद्दा आहे. आमदारांचेच निकटवर्ती रावसाहेब पाटील हे सभापती असताना हा व्यवहार झाला. कर्ज त्यांनी काढले व कर्ज फेडत नाही म्हणून जागा विक्रीचा घाट घातला आहे. या वेळी बाजार समितीत करण्यात आलेले प्रोसिडिंग हे त्यांनी वाचून दाखवले.

आमदारांना बाजार समितीत कधीच बहुमत मिळालेले नाही तसेच सतीश शिंदे सभापती झाल्यानंतर त्यांनी कोणतीही बेकायदा कृती केली नाही. उलट कर्जाचे हप्ते नियमित फेडले. शिंदे यांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात बाजार समितीची वार्षिक सभा घेऊन अहवाल प्रसिद्ध केला. सहकार मेळावा, कृषी प्रदर्शन घेतले.

पारदर्शक कारभार केला. दीड कोटी कर्ज फेडले. वरखेडी येथील बाजाराचे उत्पन्न ४० हजारांवरून एक लाखापर्यंत आणले. हे उत्पन्न लाटणारे त्यावेळी आमदारांचेच नाव सांगत होते. तसेच आमदार किशोर पाटील यांनी प्रशासक म्हणून दिलीप वाघ यांची शिफारस केली व दोघांनी संगनमताने जे व्यवहार केले ते सर्व चित्रफितीसह लोकांपुढे मांडणार असल्याचे स्पष्ट करून शेतकरी संघाच्या जागेबाबत आमदार का बोलत नाहीत?

Amol Shinde allegations of misleading voters jalgaon news
Jalgaon News : जिल्हाधिकारी महाजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

ती जागा कोणी घेतली? तसेच आमडदे कॉटन सेलची जागा जिथे आमदारांचे कार्यालय आहे, ती जागा कोणी घेतली? पुनगाव रोड भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीची जागेचा व्यवहार कोणी केला? आमदारांचीच माणसे सत्तेत असताना त्यांनी केलेला गैरव्यवहार व अवाजवी खर्च प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने संचालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर सुमारे सव्वाकोटी वसुलीचा बोजा बसवला आहे. आता यावेळी त्यांच्याच नातलगांना आमदारांनी उमेदवारी दिली आहे.

आमदारांनी किती जागा घेतल्या? कोणते व्यवहार केले? बाजार समितीच्या मुख्य गेट जवळचे स्वच्छतागृह रातोरात पाडून तेथे गाळा करून लाखो रुपये कोणी लाटले? हे येत्या २४ एप्रिलला होणाऱ्या सहकार शेतकरी पॅनलच्या मेळाव्यात व्हिडिओ चित्रफितीसह मतदारांपुढे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदारांसोबत कोणत्याही व्यासपीठावर यायला अमोल शिंदे तयार आहे. थेट प्रश्नांची उत्तरे द्यावी त्यांना बगल देण्याचा प्रयत्न आमदारांनी करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. गोविंद शेलार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

Amol Shinde allegations of misleading voters jalgaon news
Market Committee Election : न्यायालयाची लढाई जिंकलो, रणांगणही जिंकू : डॉ. सतीश पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com