Jalgaon News : अमृत, भुयारी गटारी योजनेचे धोरण ठरवा; महासभेत मागणी

amrut scheme
amrut schemeesakal

Jalgaon News : अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटारी योजना सुरू करण्याबाबत आता जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ही योजना सुरू करण्याबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी महासभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाने एकमताने केली. (demand in General Assembly to decide the policy of Amrit and underground sewerage scheme jalgaon news)

महासभेत अमृत व भुयारी गटारी योजनेच्या विलंबाबाबत सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार आगपाखड केली. सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक अनंत ऊर्फ बंटी जोशी म्हणाले, की अमृत नळ जोडणी अद्यापही झालेली नाही. आमच्या प्रभागात अमृत योजनेचे पाणी वाया जात आहे.

नळ जोडणी कोणी करावयाची याबाबत जनतेला माहितीच नाही. त्यामुळे त्याची जोडणी झालेली नाही. भुयारी गटारी योजनेबाबत भाजपचे राजेंद्र घुगे पाटील म्हणाले, की शौचालयाचे पाईप ड्रेनेजला जोडणी करण्याबाबत सांगितले जात आहे. प्रत्यक्षात जोडणी प्रशासन करणार, की नागरिकांनी करून घ्यायची याची माहिती सांगितली जात नाही.

त्यामुळे नागरिकांत संभ्रम आहे. यावर शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा म्हणाले, की अमृत योजना व भुयारी गटार योजनेबाबत आता प्रशासनाने धोरण ठरविण्याची गरज आहे. त्याबाबत आयुक्तांनी बैठक घेऊन सविस्तर माहिती द्यावी.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

amrut scheme
Market Committee Election : बोदवडला आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना भाजप युतीची सरळ लढत

शिवसेना शिंदे गटाचे ॲड. दिलीप पोकळे म्हणाले, की अमृत योजना व भुयारी गटारीबाबत स्वतंत्र महासभा घ्यावी. या चर्चेत ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, डॉ. चंद्रशेखर पाटील, मनोज चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला. त्यावरून आयुक्तांनी धोरण ठरवावे, असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी दिले.

डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या जागेचे भूसंपादन

जिल्हा रुग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेचे महापालिकेतर्फे भूसंपादन करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. या जागेवर उभारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविण्यात आला होता. त्यावरून जोरदार वाद झाला होता. त्यानंतर ही जागा महापालिकेने भूसंपादित करण्याच प्रस्ताव महासभेत ठेवला होता.

सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी हा प्रस्ताव मांडला. त्याला उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अनुमोदन दिले. एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. भाजपचे नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी प्रशासन व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.

amrut scheme
Market Committee Election : रावेर बाजार समितीसाठी 51 उमेदवार रिंगणात

मनपा फंडाच्या कामाची श्‍वेतपत्रिका

महापालिका फंडातून करण्यात येणाऱ्या कामाची श्‍वेतपत्रिका काढावी, अशी मागणी ॲड. शुचिता हाडा यांनी केली. त्याला विशाल त्रिपाठी, राजेंद्र घुगे पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यावर शहर अभियंता सोनगिरे यांनी सांगितले, की मनपा फंडातून कामांची यादी तयार केली आहे. महापालिका आयुक्तांकडे आपण सादर करणार आहोत. श्‍वेतपत्रिकेबाबत आयुक्त निर्णय घेतील.

पहिले खुले जीम होणार

मुंबई- पुण्याच्या धर्तीवर आता शहरात पहिले खुले जीम होणार आहे. छत्रपती शिवाजीनगर पुलाखालील जागेचा यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. भाजप नगरसेवक राजेंद्र मराठे यांनी हा प्रस्ताव दिला होता. तो एकमताने मंजूर करण्यात आला.

कैलास सोनवणे माझे गुरू : लढ्ढा

महासभेत रस्त्यांच्या विषयावर चर्चा होत होती. भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या प्रभागातील प्रस्तावावर चर्चा सुरू होती. त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा म्हणाले की, कैलास सोनवणे ज्येष्ठ व अभ्यासू नगरसेवक आहेत. ते माझे राजकीय गुरू आहेत. त्यांच्याकडून आपण राजकारणाचे धडे घेतले आहेत. त्यांच्या प्रभागात निधीतून कामाचा प्रश्‍न निर्माण होणे चांगले नाही. याबाबत आयुक्तांनी लक्ष द्यावे.

amrut scheme
Jalgaon Crime News : तडीपार गुन्हेगाराचा आसोद्यात गोळीबार

आयुक्तांकडून कामगारांची स्तुती अन्‌ नगरसेवक संतप्त

महापालिकेतील अमृत योजना तसेच पाणीपुरवठा लिकेजबाबत नगरसेवकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यावर आयुक्त डॉ. विद्या गायकवाड म्हणाल्या, की काही कर्मचारी वाईट, तर काही चांगले आहेत. ते कामे करतात. आपण एकदा सर्व एकदम सर्व सिस्टम बंद करून बघू. बघा कसे सर्व ठप्प होऊन जाईल.

त्यावर भाजप नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे म्हणाले, की तुम्ही कर्मचाऱ्यांची स्तुती करताय, की जनतेला धमकी देतायेत. अनंत जोशी व इतर नगरसेवकही संतप्त झाले. ते म्हणाले, की अधिकारी व कर्मचारी काम करीत नाहीत, म्हणून आम्हाला जनतेची बोलणे खावी लागतात. तुम्ही म्हणतात कर्मचारी काम करतात. त्यामुळे आम्ही चुकीचे बोलत आहोत, असा त्याचा अर्थ होत आहे. इतर नगरसेवकांनीही त्यावर आक्षेप घेतला आणि नगरसेवकांचा संताप पाहून आयुक्तांनी विषयच बदलून टाकला.

amrut scheme
Jalgaon News : डांबरीकरण रस्ते क्रॉंकिटीकरण करण्यावरून संघर्ष; शिवसेना-भाजपमध्ये वाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com