Jalgaon Crop Insurance : वंचित 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरवात

तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.
Crop Insurance
Crop Insuranceesakal

अमळनेर : तालुक्यातील पातोंडा मंडळातील वंचित असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे.

याआधीही तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची अग्रीम रक्कम मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी मिळाली होती.

Crop Insurance
Jalgaon Agriculture News : विषम वातावरणामुळे रब्बी पिकांना फटका

मात्र, त्यात पातोंडा मंडळाची यादी स्कॅन करण्याची राहून गेल्याने या मंडळातील पाच हजार शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले होते. त्याबाबत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फिर्याद मांडली.

मंत्री पाटील यांनी त्याबाबत ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

त्यानंतर आता पातोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी साडेआठ हजार रुपयांप्रमाणे रक्कम जमा होणे सुरू झाले आहे.

पातोंडा मंडळासाठी सहा कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून, सदर शेतकऱ्यांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत. मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांसह पालकमंत्री यांचे आभार मानले.

Crop Insurance
Jalgaon Municipality News : महापालिकेचा नो-व्हेईकल डे ‘भातुकलीचा खेळ’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com