Marathi Sahitya Samelan Amalner : 97 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समित्यांची घोषणा : डॉ. नरेंद्र पाठक

Planning a meeting that will make everyone proud
Planning a meeting that will make everyone proudesakal

Marathi Sahitya Samelan Amalner : अमळनेरला साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक वारसा लाभला आहे. आता ७२ वर्षांनंतर अमळनेरला मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे नियोजन सुरू आहे. (Announcement of Committees of 97th Marathi sahitya sammelan by Dr Narendra Pathak jalgaon news)

आतापर्यंत झालेल्या संमेलनांपेक्षा हे सरस असेल, वेगळे ठरेल, असा विश्वास साहित्य संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी रविवारी (ता. ३) व्यक्त केला. अमळनेर येथे संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्‍घाटन, संमेलनाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण झाले, या वेळी ते बोलत होते. मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी विविध समित्यांची घोषणा केली.

मंडळाच्या कार्यालयाचे आज नांदेडकर हॉल, अमळनेर येथे डॉ. पाठक यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. ते म्हणाले, की आता विषय संमेलनाचा किंवा मराठी साहित्याचा नाही, तर अमळनेरच्या अस्मितेचा आहे.

यामुळे आपण सर्व हे संमेलन यशस्वी करूनच दाखवू. समाजातील वेगवेगळे घटक, सोशल मीडियामुळे अनेक गैरसमज निर्माण होतात व त्यातून वाद होतात. मात्र, यापासून दूर राहून हे संमेलन यशस्वी करीत आपला वारसा पुढे नेऊ.

Planning a meeting that will make everyone proud
Amalner Kavadyatra : अमळनेरला शिवभक्तांनी काढली कावडयात्रा; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी संमेलनानिमित्त प्रताप महाविद्यालयात करण्यात येत असलेल्या कामांबाबत माहिती दिली. बजरंग अग्रवाल यांनीही मनोगत व्यक्त केले. संत सखाराम महाराज मंदिर संस्थानकडून संमेलनासाठी पाच लाखांचा निधी धनादेश स्वरूपात देण्यात आला. संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. श्याम पवार यांनी आभार मानले.

प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार सुराणा, म. वा. मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोशाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापुरे यांच्यासह शहरातील साहित्यिक, लेखक, कवी व मान्यवर उपस्थित होते.

Planning a meeting that will make everyone proud
Marathi Sahitya Samelan : जिल्ह्यातील आमदारांकडून प्रत्येकी दहा लाखांचा निधी; पालकमंत्री भुजबळ यांची सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com