ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला; प्रशासन सज्ज

अमळनेर तालुक्यातील २५ गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल
Grampanchayat Elections
Grampanchayat Elections esakal

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम आजपासून सुरु झाला आहे. सोमवारपर्यंत (ता. ६) आरक्षण सोडत काढल्या जाणार असून यासाठी निवडणूक होणाऱ्या सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याची माहिती तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांकामी आरक्षण सोडत काढण्याकरीता ३ ते ६ जून दरम्यान विशेष ग्रामसभेचे आयोजन सकाळी दहाला संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आलेले आहे. तरी या आरक्षण सोडतीच्या विशेष ग्रामसभेबाबत जाहीर सूचना व दवंडी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आपल्या मार्फत द्यावी व त्याबाबतचा प्रसिद्धी अहवाल कार्यालयाला तत्काळ सादर करण्याचे निर्देशही तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, या कामी विलंब अथवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

Grampanchayat Elections
गरजूंना शिधापत्रिकांचा लाभ मिळवून द्या : महेश ढवळे

इच्छुकांची भाऊगर्दी

ग्रामपंचायतीची निवडणूक स्थानिक पातळीवरील अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानली जाते. या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नसल्या तरी निवडणुकीत उमेदवाराची भाऊबंदकी व त्याचे व्यक्तिगत संबंध अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळेच गावात काही वेळा एकाच पक्षाचे दोघे- तिघे एकमेकांच्या विरोधातही उभे राहतात. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीची बहुतांश गावांमध्ये तरुणांनी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे. काही गावांमध्ये तर आतापासूनच पॅनल बांधणी केली जात आहे. कोणाला कोणाच्या पॅनलकडून तिकीट मिळेल, याचा अंदाज लावला जात असून त्यादृष्टीने राजकीय घडामोडींनाही चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे.

Grampanchayat Elections
तब्बल 37 लाखांच्या वाहनांवर लागणार ‘बोली’; तहसिलला लिलाव

या गावांमध्ये होणार निवडणूक

अमळनेर तालुक्यातील तासखेडे, मारवड, आमोदे, वावडे, अंतुर्ली- रंजाणे, कन्हेरे, बहादरवाडी- खोकरपाट, इंद्रापिंप्री, नगाव बुद्रूक, जानवे, नगाव खुर्द, चोपडाई, सुंदरपट्टी, कोंढावळ, हेडावे, डांगर बुद्रूक, कामतवाडी, निमझरी, रुंधाटी, मुंगसे, गंगापूरी, भिलाली, ब्राह्मणे, जैतपीर, खापरखेडा प्रडा- अंबारे या २५ गावांमध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com