Jalgaon : हत्या केल्याची कबूल... कारण मात्र सांगेना

संशयित खुनाचे नेमके कारण अद्यापही सांगत नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे.
Arrested criminal
Arrested criminalesakal

जळगाव : रायपूर कुसुंबा येथील भूषण तळेले याचे अपहरण करून हत्या करण्यात आली. संशयितांच्या अटकेनंतर मध्यप्रदेशातील जंगलात मारेकऱ्यांनी पुरलेला मृतदेह पोलिसांनी ताब्यातही घेतला. दोघांनी खुनाची कबुलीही दिली. पण अद्यापही या निघृण हत्येमागील नेमके कारण दोन्ही मारेकरी सांगत नसल्याने दोघांची वाढीव पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

भूषण जयराम तळेले (वय ३०, रा. रायपुर कंडारी) या चटई कंपनीतील कामगाराचे १७ एप्रिल रोजी अपहरण करण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात पत्नी आशा तळेले यांनी हरविल्याची तक्रार दिल्यावर तपास सुरु होऊन या खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी दोघा संशयितांना ८ जुनला अटक केली. अटकेतील भिकन परदेशी व त्याचा साथीदार विठ्ठल परदेशी अशा दोघांना पोलिस खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. खून करून मृतदेह मध्यप्रदेशात पुरून टाकल्याचेही आपल्या लेखी जबाबात सांगितले. त्यानुसार चार दिवसांच्या कोठडीत पोलिसांनी मध्यप्रदेशातून मृतदेह उकरून काढला. मृतदेहाची ओळख पटवून शवविच्छेदन करून डीएनए सॅंपल प्रयोग शाळेत पाठवण्यात आले. तरीसुद्धा अटकेतील दोघ संशयित खुनाचे नेमके कारण अद्यापही सांगत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला असून या गुन्ह्यात इतर संशयित आहेत काय, या दिशेने तपास सुरु झाला आहे. पोलिस कोठडी संपल्यावर अटकेतील दोघांना जळगाव न्या. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितांना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारपक्षातर्फे ॲड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

Arrested criminal
बोगस बियाण्यांची कळंबू येथे 50 पाकिटे जप्त
Arrested criminal
Jalgaon : गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com