
Jalgaon news : गोद्री कुंभस्थळी संत- महंतांचे आगमन; हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी
जळगाव : अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना- नायकडा समाज कुंभासाठी जामनेर तालुका व गोद्री सज्ज झाले आहे. कुंभाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (ता. २४) संतांची शोभायात्रा कुंभस्थळ ते धर्मस्थळापर्यंत काढण्यात आली. शोभायात्रेत ३० हजारांच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते. (Arrival of saints and mahants at Godri Kumbhsthal Flower shower by helicopter Jalgaon news)

कुंभासाठी दाखल झालेल्या पारंपरिक वेशभूषेतील महिला.
कुंभानिमित्त सोमवारी (ता. २३) सहा ते सात किलोमीटर परिसरातील गावात बंजारा समाजाच्या संतांचे आगमन झाले. मंगळवारी कुंभस्थळी अश्व असलेल्या ११ रथांमध्ये संतांची मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीच्या अग्रस्थानी सजविलेल्या वाहनांमध्ये संत श्री धोंडीरामबाबा, आचार्य चंद्रबाबा महाराजांच्या मूर्ती विराजमान होत्या. त्या वाहनामागे संतांचे रथ व त्यामागे संतांचे अनुयायी असलेले १० ट्रॅक्टर होते. पाच बॅन्ड, नाशिक येथील दोन ढोल पथकासह शोभायात्रा कुंभस्थळाहून धर्मस्थळाकडे रवाना झाली.

बंजारा कुंभासाठी दाखल झालेले समाजबांधव.
पुष्पवृष्टी व लेंगी नृत्य
शोभायात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे कुंभस्थळाजवळ आणि शोभायात्रा मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सकाळपासूनच कुंभस्थळी समाजबांधवांची गर्दी झाली होती. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत ‘लेंगी’ नृत्य केले. शोभायात्रेत युवकांसह नागरिकांनी ‘हा मै हिंदू हू’, ‘हा म हिंदू छू’ असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.
शोभायात्रेत पाच डबे असलेली रेल्वेगाडी सहभागी झाली होती. युवकांनी बंजारा समाजाचा श्वेतध्वज आणि हिंदू धर्माचा भगवा ध्वज हाती घेतले होते व ‘जय सेवालाल’ व ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या.
आजचे कार्यक्रम
बुधवारी (ता. २५) : सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत पल्ला, साडेदहा ते साडेअकरापर्यंत मूर्ती स्थापना, दुपारी १२ ते चारपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, चार ते सायंकाळी सहापर्यंत संत प्रवचन, संत सेवालाल महाराज अमृतलीला, सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत देवी भागवत, कृष्णलीला, रामनाव संत रामराव बापू अमृतवाणी आदी कार्यक्रम होतील.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

कुंभासाठी सज्ज सभामंडपाचे प्रवेशस्थान.
हेही वाचा: Jalgaon News : तृणधान्यमुळे राहाल व्याधींपासून दूर; मान्यवरांनी सांगितले तृणधान्याचे महत्त्व
बुधवारच्या कार्यक्रमात स्वागतपर भाषण अ.भा. धर्मजागरण प्रमुख शरद ढोले करतील. प्रास्ताविक पू. गोपाल चैतन्यजी बाबा, आशीर्वचन पू. बाबूसिंगजी महाराज, सुरेशजी महाराज, पू. महंत विश्वेश्वरानंदजी नारायण मठ (सुरत), बाबा हरनामसिंगजी, तर सत्राचा समारोप पू. गुरुशरनानंदजी महाराज करतील.
कुंभासाठी सोमवारपासूनच सात राज्यातून समाजबांधव व स्थानिक नागरिकांचे आगमन झाले आहे. बंजारा समाज भगिनी लोकगीते गात कुंभस्थळी येत होत्या.
कुंभासाठी तगडा बंदोबस्त
पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये गोद्री (ता. जामनेर) कुंभासाठी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यात पोलिस अधीक्षक १, अप्पर अधीक्षक १, उपअधीक्षक ६, पोलिस निरीक्षक १५, सहाय्यक निरीक्षक ५०, उपनिरीक्षक ५१० (महिला-पुरुष), बॉम्ब डिस्पोजल युनिट १ प्लस १२ (प्रत्येकी तीन जिल्ह्याच्या टीम), पोलिस अंमलदार : ५३२ (महिला-पुरुष), एसआपीएफ कंपनी : १ (१०० जवान), गृहरक्षकदल १२०० (महिला-पुरुष) यांचा समावेश आहे.
- एकूण : १ हजार ८९५
हेही वाचा: Bravery Award : करणच्या दारिद्र्याला शौर्याची झालर; राष्ट्रीय बालवीरता पुरस्काराचा मानकरी