Jalgaon News : वडगावला चाऱ्याअभावी गायींचे हाल; दानशूरांनी चारा दान करण्याचे आवाहन!

Cows in cow school at Vateswar Ashram.
Cows in cow school at Vateswar Ashram.esakal

मेहुणबारे (जि. जळगाव) : वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमाच्या गो शाळेत सुमारे दोनशेहून अधिक देशी गायी (Cow) आहेत.

या गायींना सध्या चाराच मिळत नसल्याने चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. (As cows are not getting any fodder at present they have to wander in the forest for fodder jalgaon news)

चाऱ्याअभावी गायींचे होणारे हाल पाहावत नसल्याने येथील गायींसाठी समाजातील दानशूरांनी चारा दान करावा, असे कळकळीचे आवाहन गोसेवक रविदास महाराज यांनी केले आहे.

वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील गिरणा काठावर असलेल्या वटेश्वर आश्रमाची गो शाळा असून कुठलाही शासकीय निधी न घेता, लोकांनी दिलेल्या देणगीतून गायींचे संगोपन केले जाते. सद्यःस्थितीत गो शाळेत दोनशेहून अधिक देशी गायींचे रविदास महाराज संगोपन करतात.

या गायींना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी परिसरातील ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य लाभते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या गायींना चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. गिरणा पट्ट्यात आता ऊस सोडला तर कुठलाही चारा उपलब्ध नाही. ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग आदी पिकांचा चारा येण्यासाठी अजून किमान महिनाभर तरी वाट पहावी लागणार आहे.

अशा परिस्थितीत कुठेही चारा नसल्याने गायींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. चाळीसगाव तालुक्यात सध्या सातत्याने जाणावणारी चारा टंचाई, पशुखाद्य तसेच चाऱ्यांचे वाढलेले भाव, शासनाच्या विविध योजनांचा गावपातळीपर्यंत लाभ न मिळणे यासह इतरही काही कारणांमुळे पशुधनाच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणारे गायींचे गोठे चाऱ्याअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Cows in cow school at Vateswar Ashram.
Road Construction : शहरातील रस्ते कोटिंगअभावी उखडले; नागरिकांना त्रास

चारा देण्याचे आवाहन

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रामातील गायींना चारा मिळावा, यासाठी रविदास महाराजांची दररोज धडपड सुरु असते. गो शाळेतील गायींसाठी पैसे न देता केवळ चाऱ्याची सढळ हाताने मदत करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

परिसरातील ग्रामस्थांनी देखील पुढे यावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. गो शाळेतील गायींच्या संगोपनासाठी रविदास महाराजांना अमोल महाराज, वैष्णव महाराज, नीलेश महाराज, वीटभट्टीवाले अण्णा आदींची मदत होत आहे.

चाऱ्याअभावी दगावल्या गायी

वटेश्वर आश्रमातील गो शाळेतील गायींना पुरेसा चारा न मिळाल्याने काही गायी दगावल्याचे स्वतः रविदास महाराज यांनी डोळ्यांत पाणी आणून सांगितले. त्यामुळे येथील चाऱ्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

Cows in cow school at Vateswar Ashram.
Jalgaon News : तळमजल्यावरील दुकानांच्या कारवाईत भेदभाव; डी. एच. प्लाझावर कारवाई

चाऱ्याअभावी आपल्या गायी दगावल्याचे दुःख सांगताना रविदास महाराज यांना अक्षरशः रडूच कोसळले. ज्यांना विविध कारणांमुळे गायी सांभाळणे शक्य होत नाही, अशा अनेकांनी या आश्रमाला गायी दान केलेल्या आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी रविदास महाराज हे समाजातील दानशूर व ग्रामस्थांच्या सहकार्याने निष्ठेने पार पाडत आहेत.

"वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथे दोनशे तर तरवाडे (ता. पारोळा) येथील समर्पण गो शाळेत सुमारे चारशे देशी गायी आहेत. अशा सहाशेच्यावर गायींचा सांभाळ करणे चाऱ्याअभावी अवघड झाले आहे. पशुसंवर्धनाशिवाय निसर्गाचे संतुलन राहूच शकत नाही.

सध्या चांगला चारा उपलब्धच होत नसल्याने गायींना नको तो चारा वैरण म्हणून खावा लागत आहे. गायींच्या चाऱ्यासाठी ज्यांना ज्यांना मदत शक्य करणे शक्य आहे, त्यांनी ती करावी व गो रक्षणाच्या या कार्यात हातभार लावावा." - बाबा रविदास महाराज, वटेश्वर वैष्णव समर्पण गोशाळा, वडगाव लांबे. (ता. चाळीसगाव)

Cows in cow school at Vateswar Ashram.
Jalgaon Crime News : पिस्तूल, काडतूस घेत दहशत माजविणाऱ्याला अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com