
संत सखाराम महाराज पायीदिंडीचे पारोळ्यात जल्लोषात स्वागत
पारोळा (जि. जळगाव) : श्री संत सखाराम महाराज दिंडीचे शहरात आगमन होताच भाविकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केले. अमळनेर येथून काल (ता. १५) दुपारी संत सखाराम महाराज यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान झाले होते. रात्री दहाला ही दिंडी शहरात दाखल झाल्यानंतर शहरातील वाणी मंगल कार्यालयात दिंडीचा मुक्काम झाला. आज दुपारी चारच्या सुमारास दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. (Ashadhi wari Sant Sakharam Maharaj dindi arrived in Parola)
श्री संत सखाराम महाराजांच्या दिंडीला मोठी परंपरा लाभली असून यंदा या दिंडीत सुमारे दोन हजार वारकरी सहभागी झाले आहेत. जसजशी दिंडी पंढरपूरकडे आगेकूच करेल तसतसे मोठ्या संख्येने भाविक दिंडीत सहभागी होत आहेत.
हेही वाचा: Ashadhi Wari : दिल्लीकर ‘वारकऱ्यांना’ ही विठूरायाची ओढ
विठ्ठलाचे नामस्मरण करीत दिंडीत टाळ, मृदुंग व वीणाधारी भाविकांसह दिंडीतील वारकऱ्यांचे शहरात दिंडी मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने वातावरणात स्वागत करण्यात आले. गावोगावीच्या महिला वारकरी देखील दिंडीत सहभागी झाल्या आहेत. शहरात दिंडीचे आगमन झाल्यानंतर गजेंद्र कुलकर्णी, सोनू चौधरी, महेश महाराज, धनेश पाठक, दीपक पिले, श्री. मोहरीर, सुनील जोशी, सुखदेव पाठक, यशवंत संत यांनी व्यवस्थापन केले. सकाळी सखाराम महाराजांनी विठ्ठल मंदिर व श्री बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर वाणी मंगल कार्यालयात तासभर भाविकांना प्रवचन व दर्शनाचा लाभ मिळाला. दुपारी चारच्या सुमारास दिंडी पुढे मार्गस्थ झाली.
हेही वाचा: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘ठिबक’मध्ये 25 टक्के सूट : श्रीराम पाटील
Web Title: Ashadhi Wari Sant Sakharam Maharaj Dindi Arrived In Parola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..