Jalgaon : दोघांवर प्राणघातक हल्ला; 2 संशयिताना अटकेत, 1 फरार

Police Along with Police
Police Along with Policeesakal
Updated on: 

पहूर (दि. नाशिक) : येथे पेठ ग्रामपंचायत इमारतीखाली अंडापाव गाडीवर सतीष कडुबा पांढरे व राहुल नाना भोंडे या युवकांवर चाकूने सपासप वार करून दोघांना गंभीर जखमी (Serious Injured) केल्याची घटना घडली आहे. यातील तीनही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढत दोन संशयितांना अटक केली तर एक जण फरार आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळापासून बसस्थानकमार्गे पोलिस ठाण्यापर्यंत संशयितांची धिंड काढली. (Assault on both 2 suspects arrested 1 absconding at Jamner Jalgaon Crime News)

पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलिस उपनिरीक्षक संदीप शेटे, पोलिस कर्मचारी गोपाल माळी, भरत लिंगायत, ईश्वर देशमुख, विनय सानप, रवींद्र देशमुख, ज्ञानेश्वर ढाकरे यांनी संशयितास वरखेडा शिवारातून शेतीच्या बागेतून अटक केली. यात शुभम रमेश पाटील, बंडू एकनाथ पाटील या दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, यातील रोहित दीपक थोरात उर्फ चिक्या हा फरार झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

Police Along with Police
जुने नाशिक : हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

दरम्यान, गंभीर जखमी सतीश कडूबा पांढरे व राहुल नाना भोंडे यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले असून, सोमवारी (ता. ३०) दुपारी पहूर पोलिस ठाण्यात विलास कडूबा पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित थोरात, शुभम पाटील, बंडू पाटील या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे तपास करीत आहेत.

Police Along with Police
Nashik : गंगापूरला आणखी 1 खून

संशयितांची गावातून धिंड

अटकेतील संशयित शुभम रमेश पाटील व बंडू एकनाथ पाटील या दोघांना घटनास्थळापासून पहूर बसस्थानक मार्गे थेट पहूर पोलिस ठाण्यापर्यंत त्यांची धिंड काढण्यात आली. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com