तक्रारदार महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी; जळगाव महिला शोषण प्रकरणाला गृहमंत्र्याची 'क्लिन चिट' 

तक्रारदार महिलेच्या विरोधात अनेक तक्रारी; जळगाव महिला शोषण प्रकरणाला गृहमंत्र्याची 'क्लिन चिट' 
Updated on

जळगाव ः  येथील महिला वसतिगृहातील अत्याचारप्रकरणी चार सदस्य समिती नेमून दोन दिवसात चौकशी करण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार केलेली चौकशी, जाबजबाबनुसार आज विधीमंडळात आज अहवाल सादर केला. यात पोलिस वसतीगृहात जावू शकत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेली चौकशी व जाबजबाबातून आरोप केलेल्या प्रकारात कोणतेही तथ्य आढळलेले नाही. तसेच आरोप केलेली महिला वेडसर असून आरोपात कोणतेही तथ्य आढळलेली नाही असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अहवाल सादर केला. तसेच मंत्री यशोमती ठाकूर, आमदार नाना पटोले यांनी महिला वसतीगृहाची बदनामी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

जळगाव महिला वसतीगृहात महिला व मुलींना वस्त्र काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची तक्रार महिलेने केली होती. या प्रकरणी विधिमंडळात विरोधाकांनी सत्ताधारींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होते. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसात उच्चअधिकाऱ्यांच्या समितीकडून चौकशी करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव महिला वसतीगृह प्रकरणी आज विधिमंडळात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समितीने दिलेल्या अहवालात कोणतेच तथ्य नसल्याचे सांगितले. 

बदनामी करण्यांवर गुन्हे दाखल करा
विधिमंडळात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तसेच आमदार नाना पटोले यांनी या प्रकरणी महिला वसतीगृहाचे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळ अशा बदनामी करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. 

जळगावची मुद्दाम बदनामी- मंत्री पाटील
जळगाव शहरातील महिला वसतीगृहात झालेला प्रकाराची वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यात बातम्या आल्या.  मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. परंतू असा प्रकार झालेला नसून आमचा मतदार संघ असलेला जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असून बदनामी करण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

 गृहमंत्री अनिल देशमुख काय म्हणाले... 
- जळगाव वसतीगृहातील मुलींना नग्न करून नाचायला लावले होते त्याच्या चौकशीसाठी ६ महिला अधिकार्‍यांची समिती करण्यात आली होती
- १७ महिला तिथे राहत होत्या
- ४१ जणांची साक्ष घेतल्या.
- बातमी आली त्यात कोणतेही तथ्य नाही 
- रत्नमाला सोनार या महिलेने तक्रार केली होती.
- ती वेडसर असल्याची तक्रार तिच्या नवर्‍याने यापूर्वी केली आहे
- तिथे एकही पोलीस उपस्थित नव्हता
- वसतीगृहात महिलांची डान्स आणि गरब्याच्या कार्यक्रम ठेवला होता.
- महिला वसतीगृह असल्याने तिथे पोलीस जाऊ शकत नाही.
- पोलीसांनी व्हिडोओ कोणताही व्हिडोओ केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Yogesh Nemade
Marathi News Esakal
www.esakal.com