Latest Marathi News | लहानमुलाच्या ओरडण्यावरुन बापावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knife attack

Jalgaon : लहानमुलाच्या ओरडण्यावरुन बापावर हल्ला

जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) येथील इंदिरानगरात लहान मुलगा गल्लीतून ओरडत पळत सुटल्याची चीड येऊन त्याच्या पित्यावर शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली. जखमीवर खासगी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

शिरसोली इंदिरानगरातील रहिवासी तय्यब खान कलीम खान (वय ३०) मंगळवारी (ता. २७) दुपारी तीनला त्यांचे मामा सलीम शेख मेहमूद यांच्यासोबत घराबाहेर बोलत उभे होते. त्याच वेळेस सलीम शेख यांचा लहान मुलगा शाहीद गल्लीतून आरोळ्या मारत पळत येत होता. त्याचा राग येऊन त्यांच्या घरासमोर राहणारे दत्तू ओंकार न्हावी यांनी त्याला रागावले.(Attack on father due to childs cry jalgaon news )

हेही वाचा: Devendra Fadanvis: PFIवरील बंदीनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले...

मुलाला कशाला रागातोय, लहान आहे, असे म्हटल्याचा राग आल्याने दत्तू न्हावी याने हातात शस्त्र घेत मुलाचे वडील सलीम शेख मेहमूद याच्या मानेवरच हल्ला केला. थोडक्यात पहिला वार चुकल्याने पाठीमागे डोक्याच्या खाली गंभीर दुखापत झाली. दुसरा वार तसाच पुढून केल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेत भांडण सोडविल्याने जखमी सलीमचा जीव बचावला. त्यास तत्काळ दुचाकीने जिल्‍हा रुग्णालय व तेथून खासगी ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाल.

हेही वाचा: Nagpur : नऊ प्रकारच्या चहाची निर्मिती करणारी ‘नवदुर्गा’