Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

self immolation of farmer in front Collector office
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव : सात्री (ता.अमळनेर) येथील शेतकऱ्याला महावितरणकडून वीज कनेक्शन दिले जात नसल्याने प्रजासत्ताक दिनी त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बंदोबस्ता-वरील पोलिसांनी प्रसंगावधान राखत शेतकऱ्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. प्रतिबंधात्मक कारवाई करून या शेतकऱ्याची सुटका करण्यात आली.

हेही वाचा: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी मानले PM मोदींचे आभार

सात्री येथील रहिवासी योगराज पाटील हा तरुण शेतकरी. त्यांच्याकडे दहा बिघे एवढी शेतजमीन असून एकमेव तेच उत्पन्नाचे साधनही आहे. अशात संपूर्ण कुटुंब शेतात राबते तेव्हा कुटुंबाची गुजराण होते, यंदा शेतीत मक्याचे पीक लावले आहे वीज संयोजन नसल्याने पिकांना पाणी देण्यासाठी खूप त्रास होतो. वीज जोडणी (कनेक्शन) मिळावे, यासाठी तब्बल दहा महिन्यांपासून महावितरण कंपनीकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, या-ना त्या कारणाने त्यांना टाळले जात होते. अधिकारी थारा देत नाहीत, अभियंता ऐकत नसल्याने मेटाकुटीस आलेल्या योगराज पाटील यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सूचना करूनही कुठलीच कार्यवाही आत्तापर्यंत झालेली विद्युत विभागाकडून झाली नसल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा: लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारी संतापजनक; दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी

जिवाची घालमेल.. अन्‌ टोकाचा निर्णय

थंडी बऱ्यापैकी असल्याने कमी पिकातही योगराज यांच्या शेतात मका तरारला आहे. मात्र, जसे उन वाढेल पाण्याची अधिक गरज भासेल म्हणून योगराज यांची धडपड सुरु आहे. वीज मंडळात कोणी ऐकत नाही, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपयोग होत नाही.. शेतात पीक उभे आहे, वाढत्या उन्हाने हाता तोंडाशी आलेला हिरावून जाईल.. म्हणून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरु असताना जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच पेट्रोल ओतून योगराज स्वतःला पेटवून घेण्याच्या तयारीत असतानाच जिल्‍हापेठ पेालिसांनी झडप घालत त्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी त्याची समजूत काढून प्रतिबंधात्मक कारवाई करत नंतर सोडून देण्यात आले.

Web Title: Attempt Of Self Immolation Of Farmer Front Collector Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top