मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेलांनी मानले PM मोदींचे आभार

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती, यामध्ये नाडेला यांचाही समावेश होता.
Padma Bhushan Satya Nadella
Padma Bhushan Satya Nadella

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ (Microsoft CEO) सत्या नाडेला (Satya Nadella) यांना नुकताच पद्म भूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांचे आभार मानले आहेत. नाडेला यांनी ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Padma Bhushan Microsoft CEO Satya Nadel thanked PM Modi)

नाडेला म्हणाले, "पद्म भूषण पुरस्कार मिळणं तसेच अनेक असामान्य लोकांबरोबर आपलीही खास ओळख निर्माण होणं हा मोठा सन्मान आहे. यासाठी मी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारतीयांचा आभारी आहे. यामुळं आता पुढे संपूर्ण भारतभरातील लोकांसाठी काम करताना त्यांना अनेक साध्य साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरासाठी मदत करत राहिनं"

Padma Bhushan Satya Nadella
आजवर केली नाही अशी गोष्ट काँग्रेस पंजाब निवडणुकीसाठी करणार!

यंदाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये नाडेला यांच्यासह अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचई तसेच टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनाही पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com