पोलिस विभागात चहापेक्षा किटली गरमचा अनुभव; हजेरीमास्तरची कर्मचाऱ्याला दमबाजी

संबंधित कर्मचाऱ्याने हजेरीमास्तरला लाईव्ह लोकेशनसह फोटो पाठवला तरी त्याचे समाधान झाले नाही.
Attendance master harassing the employee in the police department
Attendance master harassing the employee in the police departmentesakal

जळगाव : शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचारी तपासाला शिर्डीला गेले असताना त्यांना अडचणीची ड्यूटी रद्द करण्याची मागणी केल्याने हजेरीमास्तरकडून दम दिला गेल्याची तक्रार पोलिस कर्मचारी अजित पाटील यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षकांना केली आहे. (Latest Marathi News)

Attendance master harassing the employee in the police department
अबब! कलेक्टर बंगल्या समोरच वाहनावर हल्ला; मद्यधुंद दारुड्यांचा धिंगाणा

जळगाव उपविभागातील जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याची हद्द विभाजन करुन तयार झालेल्या रामानंदनगर पोलिस ठाण्यात जिल्ह्यातून कुठलाही पोलिस कर्मचारी बदली होऊन जाण्यास तयार नाही. पोलिस ठाण्यात मंजूर पदसंख्येपेक्षाही कमी कर्मचारी असल्याने येथे कार्यरत पोलिसांवर अधिकचा ताण येतो. गुन्ह्यांना तपासाधिकारी भेटत नाही. ठराविक ‘लाडक्या’ कर्मचाऱ्यांना क्लिष्ट तपासापासून अलिप्त ठेवले जाते. खाली माना घालून काम करणाऱ्यांनाच राबवले जात असल्याच्या तक्रारी सुरवातीपासूनच आहे. अशात हजेरी मास्तरकडेच कलेक्शन असले तर, साधारण जनरल ड्यूटी असलेल्या कर्मचाऱ्यांची मरणूक होते. तसाच प्रकार रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या बाबतीत वारंवार घडतोय. पोलिस ठाण्यात दाखल मिसिंग(बेपत्ता)च्या तपासाकरिता अजित पाटील हे शिर्डी येथे गेले असताना त्यांना परत येण्यास रेल्वे चुकल्याने ते कोपरगाव स्थानकावरच अडकले.

Attendance master harassing the employee in the police department
तरूणाचा अपघाती मृत्यू; तालुका पोलिसात गुन्हा दाखल

रात्री आठ वाजता त्यांच्या मोबाईलवर उद्याचा ड्यूटी तक्ता पडल्यावर त्यांनी पावणेनऊ वाजता हजेरीमास्तरला फोन लावून सांगितले, की ‘मी अद्याप तपासावरुन परतलोच नाही’, रेल्वे सुटल्याने कोपरगावात अडकलोय तर, सकाळी ड्युटीला कसा पोहचेल, माझी ड्यूटी बदलून द्या’. मात्र, हजेरीमास्तरने समजूत न काढता चक्क तुम्ही पोलिस निरीक्षकांशी बोला, डीवायएसपींशी बोला किंवा एसपींना तक्रार करा... ड्यूटी बदलणार नाही. सकाळी यावेच लागेल. यावर अजित पाटील यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांना फोन करुन हकिकत सांगितल्यावर त्यांनी सकाळी आल्यावर समोरासमोर भेटून विषय मांडण्यास सांगितले आहे. संबंधित कर्मचाऱ्याने हजेरीमास्तरला लाईव्ह लोकेशनसह फोटो पाठवला तरी त्याचे समाधान झाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com